शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

पाणीबिलापोटी २७ कोटींची थकबाकी, उरणमधील १४ ग्रामपंचायतीचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 12:12 AM

तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र आणि ३५ ग्रामपंचायतींना एमआयडीसीमार्फत रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, पाणीपुरवठ्याची बिले भरण्याची तत्परता मोजक्या ग्रामपंचायतींकडून दाखवली जाते.

- मधुकर ठाकूरउरण : उरण तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींकडे एमआयडीसीची डिसेंबर २०१९ अखेर पाणीबिलाची २७ कोटी ११ लाख १६ हजार ०६७ रुपये इतकी थकबाकी आहे. यामध्ये आर्थिकदृष्ट्या सधन समजल्या जाणाऱ्या जेएनपीटी आणि ओएनजीसी हद्दीतील १२ ग्रामपंचायती आघाडीवर आहेत. ग्रामपंचायतींकडे असलेल्या कोट्यवधींच्या थकबाकीमुळे मात्र एमआयडीसीच्या विकासकामांना खीळ बसली असल्याची माहिती उरण उपअभियंता रणजित बिरंजे यांनी दिली.तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र आणि ३५ ग्रामपंचायतींना एमआयडीसीमार्फत रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, पाणीपुरवठ्याची बिले भरण्याची तत्परता मोजक्या ग्रामपंचायतींकडून दाखवली जाते.ग्रामपंचायतींकडील पाणीबिलांच्या थकबाकीचा आकडा प्रत्येक महिन्याकाठी आणि दरवर्षी वाढतच आहे.डिसेंबर २०१९ महिन्याअखेरपर्यंत तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींकडे एमआयडीसीची २७ कोटी ११ लाख १६ हजार ६७ रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीदारांमध्ये नवीन शेवा- दोन कोटी ४० लाख ५३ हजार ५००, हनुमान कोळीवाडा- ३० लाख १६ हजार २१६, करळ - ६४ लाख २५ हजार २६२, धुतुम - ९१ लाख ३३ हजार २२२, जसखार - एक कोटी १६ लाख ७२ हजार ६३९, बोकडवीरा - एक कोटी ६३ लाख ६३ हजार २८०, फुंडे-दोन कोटी ३७ लाख ६७ हजार ८१२, सावरखार- ३३ लाख ९७ हजार १२८, डोंगरी - ४१ लाख ४८ हजार ६९८, सोनारी- ७८ लाख १२ हजार ५३, नागाव - एक कोटी एक लाख ६८ हजार २८८, चाणजे-पाच कोटी ४९ लाख ९२ हजार ३१२, चिर्ले-एक कोटी ६५ लाख नऊ हजार ७१४, केगाव - एक कोटी ५६ लाख ५६ हजार ८३, म्हातवली - ७२ लाख ५० हजार १८६, तेलीपाडा - दोन लाख ३२ हजार २८२ आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.तर चिरनेर कनेक्शन - दोन कोटी ७२ लाख राच हजार ४९, खोपटा कनेक्शन- सहा लाख ४७ हजार ४४४, दिघोडे - एक कोटी २७ लाख ७२ हजार २७२, दादरपाडा- १७ लाख ६३ हजार ९१२, वेश्वी-एक कोटी नऊ लाख ९१ हजार ९०४, रांजणपाडा- चार लाख ४६ हजार १११, नवघर-२० लाख ६६ हजार ७७, पागोटे- सहा लाख २४ हजार ६२३ आदी थकबाकीदार आठ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा एमआयडीसीकडून याआधीच बंद करण्यात आला आहे. मात्र, ग्रामपंचायतींकडे थकबाकी कायम आहे.थकबाकीदारांना नोटीसथकबाकीदारांमध्ये जेएनपीटी हद्दीतील नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, फुंडे, डोंगरी, जसखार, सोनारी, करळ, सावरखार, बोकडवीरा या नऊ तर ओएनजीसी हद्दीतील नागाव, म्हातवली, चाणजे या तीन अशा एकूण आर्थिकदृष्ट्या सधन म्हणून ओळखल्या जाणाºया १२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. वसुलीसाठी थकबाकीदार असलेल्या ग्रामपंचायतींना सातत्याने नोटिसाही बजावण्यात येत आहेत. मात्र, त्यानंतरही ग्रामपंचायतींकडून थकबाकीची रक्कम जमा करण्यात टाळाटाळ केली जात आहे.

टॅग्स :Waterपाणी