शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

केरळ आपत्तीग्रस्तांना महापालिकेची २५ लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 01:52 IST

नागरिकांनाही मदतीचे आवाहन; उपमहापौरांनी दिले एक महिन्याचे मानधन

नवी मुंबई : केरळमधील नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना नवी मुंबई महानगरपालिकेने मदतीचा हात पुढे करत २५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांनीही एक महिन्याचे मानधन दिले आहे.राष्ट्रीय आपत्तीच्या काळामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. केरळमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी महापालिकेने २५ लाख रुपये दिले आहेत. वाशीमधील केरळ भवनमध्ये जाऊन हा धनादेश तेथील व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी महापौर जयवंत सुतार, आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, रवींद्र इथापे, रवींद्र पाटील, साबू डॅनीयल व इतर मान्यवर उपस्थित होते.नवी मुंबईमधील प्रत्येक नागरिकाने त्यांना शक्य होईल तेवढी मदत केरळमधील आपत्तीग्रस्तांना करावी, असे आवाहन या वेळी महापौर जयवंत सुतार यांनी केले. उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांनीही एक महिन्याचे मानधन आपत्तीग्रस्तांना देऊन शहरवासीयांना मदतीचे आवाहन केले आहे.एपीएमसीमधूनही कर्मचारी सेनेची मदतमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचारी सेनेनेही केरळ आपत्तीग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले आहे. लवकरच मदत संकलित करून ती आपत्तीग्रस्तांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया कर्मचारी सेनेचे नारायण महाजन यांनी दिली. शहरातील सामाजिक संघटनांनी, व्यापाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात मोफत धान्य उपलब्ध करून आपत्तीग्रस्तांना मदत केली आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई