शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

२४ कोटींचा विदेशी सिगारेटचा साठा जप्त; पाच संशयित अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 09:14 IST

या प्रकरणी पाच संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मधुकर ठाकूर -

उरण : न्हावा- शेवा सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन कोटींच्या ई-सिगारेटचा साठा जप्त करण्याची घटना ताजी असतानाच शुल्क विभागाच्या मुंबई डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी विदेशातून तस्करीच्या मार्गाने पाठविण्यात आलेला २४ कोटींचा विदेशी सिगारेटचा साठा रविवारी (१४) जप्त केला. जेएनपीए परिसरातील आर्शिया वेअर हाऊसमध्ये ४० फुटी कंटेनरमधून एक कोटी २० लाख प्रतिबंधित विदेशी सिगारेटचा साठा आढळला आहे. या प्रकरणी पाच संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारावर तस्करीच्या मार्गाने विदेशी सिगारेटचा साठा जेएनपीए बंदरातून निर्यात करण्यात आल्याची माहिती मुंबई डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर सापळा रचण्यात आला. 

विदेशातून तस्करीकंटनेरमध्ये प्रतिबंध असलेल्या व विदेशातून तस्करीच्या मार्गाने पाठविण्यात आलेल्या उडन गरम, डनहिल,बेन्सन ॲड हेजेस, ईसी लाईट, मोड आदी प्रकारांतील एक कोटी २० लाख सिगारेटचा साठा आढळला. 

तीन कोटींच्या इ सिगारेटदोन दिवसांपूर्वीच न्हावा- शेवा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन कोटींच्या ई- सिगारेटचा साठा जप्त केला आहे. विदेशातून तस्करीच्या मार्गाने पाण्याची बाटली, चुंबकीय बटण, बेल्ट बकलच्या बनावट नावाखाली  ४० फुटी कंटेनरमधून पाठविण्यात आलेला  ४५,८८६  ई-सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला आहे.

४० फुटी कंटेनर संशयाच्या फेऱ्यातकसून केलेल्या तपासात जेएनपीए परिसरातील आर्शिया वेअरहाऊसमधील  एक ४० फुटी कंटेनर संशयाच्या फेऱ्यात अडकला. तपासणीत २४ कोटी किमतीचा विदेशी सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला असून पाच संशयितांनाही अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई