शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

यादवनगरच्या २२०० विद्यार्थ्यांना न्याय, एमआयडीसीकडून मिळणार ६४५० चौ.मी.चा भूखंड; ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 2:52 AM

यादवनगरमधील पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षण घेणा-या २२०० विद्यार्थ्यांना अखेर न्याय मिळाला आहे. महापालिकेने एमआयडीसीकडून ६४५० चौरस मीटरचा भूखंड मागितला असून, तेथे भव्य इमारत उभारण्यात येणार आहे.

नवी मुंबई : यादवनगरमधील पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षण घेणा-या २२०० विद्यार्थ्यांना अखेर न्याय मिळाला आहे. महापालिकेने एमआयडीसीकडून ६४५० चौरस मीटरचा भूखंड मागितला असून, तेथे भव्य इमारत उभारण्यात येणार आहे. २७ वर्गखोल्यांसह प्रयोगशाळा, ग्रंथालय, ए.व्ही. रूमची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.नवी मुंबईमधील सर्वाधिक विद्यार्थी असणा-या महत्त्वाच्या शाळांमध्ये यादवनगर शाळा क्रमांक ७७ चा समावेश आहे. २२०० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत; परंतु शाळेला स्वतंत्र इमारतच नसल्याने नगरसेविकेचे जनसंपर्क कार्यालय, रामलीला कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या स्टेजभोवती पत्रे लावून शाळा सुरू केली आहे. याशिवाय वाहने उभी करण्यासाठीच्या गॅरेजमध्ये दाटीवाटीने विद्यार्थी बसविले जात आहेत. अपुरा शिक्षकवर्ग, फळा, खडू या अत्यावश्यक वस्तूही पालिकेकडून वेळेत पुरविण्यात येत नाहीत. प्रसाधनगृह, पाणी, वीज या सुविधाही व्यवस्थित नाहीत. जागा नसल्यामुळे यंदा प्रभागाच्या बाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आले होते. महापालिकेने स्कूल व्हीजनच्या माध्यमातून अनेक ठिकाणी बहुमजली इमारती उभ्या केल्या आहेत. अनेक इमारतींचा वापरही केला जात नाही. दुसरीकडे विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या यादवनगरसारख्या झोपडपट्टी परिसरामध्ये नवीन इमारत उभारण्याकडे लक्ष दिले जात नव्हते. माजी नगरसेवक रामअशिष यादव यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. महापालिका प्रशासनाकडेही पाठपुरावा केला होता.यादवनगरमधील शाळेचा व येथील विद्यार्थ्यांच्या गैरसोयीविषयी ‘लोकमत’नेही वारंवार आवाज उठविला होता. दोन वर्षांपासून सातत्याने या समस्येकडे लक्ष वेधले होते. अखेर महापालिका प्रशासनाने एमआयडीसीकडून ६४५० चौरस मीटरचा भूखंड उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. एमआयडीसीनेही भूखंड देण्याचे मान्य केले आहे. त्या भूखंडावर २८१३ चौरस मीटर बांधकाम करण्यात येणार आहे. शाळेसाठी २७ वर्गखोल्या, शिक्षकांकरिता स्वतंत्र कक्ष, मुख्याध्यापकांकरिता स्वतंत्र कक्ष, ए.व्ही. रूम, प्रयोगशाळा, ग्रंथालयाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवी मुंबईमधील भव्य शाळांमध्ये यादवनगरचाही समावेश होणार असून, विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये ११ कोटी ५४ लाख रुपये खर्चास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. प्रत्यक्ष भूखंड ताब्यात आल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू करून नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. पालिकेच्या निर्णयामुळे या परिसरातील लोकप्रतिनिधी, पालक यांनी समाधान व्यक्त केले असून शाळेचे काम लवकर सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.>दोन वर्षे पाठपुरावायादवनगरमधील शाळेला भूखंड मिळावा, यासाठी यापूर्वीचे नगरसेवक रामअशिष यादव यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. शाळेसाठी तात्पुरती जागाही त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. ‘लोकमत’नेही दोन वर्षांपासून सातत्याने या विषयावर लक्ष वेधले होते.