शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईकरांना प्रतिमाणसी २०० लीटर पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 22:58 IST

निकषापेक्षा मिळते जास्त पाणी; उत्पन्नापेक्षा महापालिकेकडून प्रतिवर्षी २७ कोटी जादा खर्च

- नामदेव मोरे नवी मुंबई : राज्यात सर्वत्र दुष्काळाची स्थिती असताना नवी मुंबईकरांना मात्र मुबलक पाणी उपलब्ध होत आहे. शासन निकषाप्रमाणे प्रतिमाणसी प्रतिदिन १५० लीटर पाणी मिळणे आवश्यक असताना पालिकाक्षेत्रात २०० लीटर पाणी दिले जात आहे. पाणीबिलाच्या माध्यमातून वर्षाला सरासरी ८० कोटी उत्पन्न होत असून, देखभाल व दुरुस्तीसाठी तब्बल १०८ कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत.नवी मुंबई महानगरपालिकेने पाणीपुरवठ्यासाठी मोरबे धरण विकत घेतले आहे. बारवी धरणावर बांधलेल्या धरणाची उंची १९४ फूट असून ११२२० फूट लांबी आहे. धरणाने ८७९० चौरस फूट क्षेत्र व्यापले आहे. ९७८ हेक्टर जमीन धरणक्षेत्राने व्यापली आहे.पालिकेने ११३० किलोमीटर लांब जलवाहिनीचे जाळे तयार करून एक लाख २० हजार ४९३ घरगुती व ८७४४ व्यावसायिक जोडणी देऊन शहरात पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या बहुतांश परिसराला २४ तास पाणीपुरवठा केला जात आहे. एमआयडीसीमधील झोपडपट्टी परिसराला बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. सद्यस्थितीमध्ये धरणामध्ये ७१ मीटरपर्यंत जलसाठा असून पाऊस पडला नाही तरी आॅगस्टपर्यंत तो पुरू शकतो. शासनाच्या निकषाप्रमाणे प्रतिमाणसी १५० लीटर पाणी मिळणे आवश्यक आहे.राज्यातील अनेक महानगरांना हा निकष पाळणे शक्य होत नाही; परंतु नवी मुंबई महानगरपालिका प्रतिदिन प्रतिमाणसी २०० लीटर पाणी उपलब्ध करून देत आहे. निकषापेक्षा हे प्रमाण ५० लीटरने जास्त आहे. सद्यस्थितीमध्ये प्रतिदिन शहराला ३९० दशलक्ष लीटर एवढा पाणीपुरवठा रोज केला जात आहे. जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्उत्थान अभियानाच्या मंजूर प्रकल्प अहवालाप्रमाणे पाणीपुरवठा वितरण व्यवस्था ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर चालविणे आवश्यक आहे. शासनानेही आॅगस्ट २०१० मध्ये पाण्याचे दर ठरविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरविली आहेत. त्यानुसार पाणीपुरवठा योजनांचा देखभाल दुरुस्तीसाठी होणारा खर्च पाणीबिलांमधून मिळणे आवश्यक आहे; परंतु नवी मुंबईमध्ये १५ वर्षांमध्ये पाणीदर वाढविले नसल्यामुळे उत्पन्न व खर्चाचा ताळेबंद बसत नाही.सद्यस्थितीमध्ये पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल खर्चावर वर्षाला सरासरी १०८ कोटी रुपये खर्च होत आहेत; परंतु पाणीबिलामधून जेमतेम ८० कोटी रुपये उत्पन्न होत आहे. प्रत्येक वर्षी २८ कोटी रुपयांची तूट सहन करावी लागत आहे. देशाचे महालेखाकार, स्थानिक लेखापरीक्षक यांनीही पाणी देयक व योजनांवरील खर्च यांचा ताळमेळ बसणे आवश्यक असल्याचे मत नोंदविले आहे. पार्श्वभूमीवर निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यासाठी पाणीदराचा प्रस्ताव पुन्हा सर्वसाधारण सभेसमोर मांडण्याचा निर्णय घेतला आहे.महापालिका कार्यक्षेत्रामधील पाणीदर कमी आहेत. अनेक वर्षामध्ये त्यामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. पुढील वर्षासाठीही त्यामध्ये कोणतीच वाढ करण्यात आलेली नाही. दराविषयी काही गैरसमज पसरले असल्यामुळे पाणीदराविषयीचा प्रस्ताव माहितीस्तव सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आलेला आहे.- डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, महापालिका

टॅग्स :WaterपाणीNavi Mumbaiनवी मुंबई