शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या ४० टक्के शुल्क वाढीमुळे जेएनपीए बंदरात २०० कंटेनर होल्डवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 18:16 IST

४००० टन कांदा सडण्याच्या तयारीत : सुमारे २० कोटींचे आर्थिक नुकसान : व्यापारी, शेतकरी, निर्यातदार चिंतेत

मधुकर ठाकूर

उरण : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा शनिवारी (१९)  अचानक निर्णय घेतल्याने जेएनपीए बंदरात आणि बंदरा बाहेरील विविध कंटेनर यार्ड मध्ये सुमारे २०० कंटेनर कस्टम विभागाने होल्ड केले आहेत.कांदा नाशिवंत माल असल्याने मलेशिया, श्रीलंका, दुबई आदी देशात पाठविण्यात येणारा सुमारे चार हजार टन कांदा सडण्याच्या तयारीत आहे.

यामुळे व्यापारी, शेतकरी, निर्यातदार कंपन्यांचे सुमारे २० कोटींचे आर्थिक नुकसान होणार असल्याची माहिती स्वान ओव्हरहेड या निर्यात कंपनीचे मालक राहुल पवार यांनी दिली. केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात शुल्क शुन्यावरुन थेट ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र केंद्र सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे व्यापारी, शेतकरी, निर्यातदार आदी सर्वजण हवालदिल झाले आहेत.शनिवारी केंद्र सरकारच्या निर्णयाआधीच जेएनपीए बंदरातच सुमारे कांद्याचे ६०- ७० कंटेनर निर्यातीसाठी तयार होते.

मात्र कस्टम विभागाने कांद्याचे कंटेनर होल्डवर ठेवले आहेत.तर शेकडो कांद्याचे शेकडो कंटेनर बंदराबाहेर  निर्यातीच्या प्रतिक्षेत उभे आहेत.तर जेएनपीए अंतर्गत असलेल्या विविध बंदरात आणि विविध कंटेनर यार्डमध्ये महाराष्ट्रातुन विविध ठिकाणांहून आलेले सुमारे निर्यातीसाठी आलेले सुमारे २०० कंटेनर होल्डवर ठेवण्यात आले आहेत.या कंटेनर कार्गोमध्ये निर्यातीसाठी पाठविण्यात आलेला सुमारे ४००० टन कांदा सडण्याच्या तयारीत आहे.यामुळे व्यापारी, शेतकरी,निर्यातदार कंपन्यांचे सुमारे २० कोटींचे आर्थिक नुकसान होणार असल्याची माहिती निर्यातदार आणि बच्चूभाई ॲण्ड कंपनीचे मालक इरफान मेनन यांनी दिली.केंद्र सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे मात्र शेकडो निर्यातदार आर्थिक संकटात सापडले असल्याचेही इरफान मेनन यांनी सांगितले.

टॅग्स :uran-acउरणNavi Mumbaiनवी मुंबईonionकांदा