शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन
2
भाजपा खासदाराच्या बहि‍णीला भररस्त्यात दांडक्याने बेदम मारले; Video व्हायरल, नेमका प्रकार काय?
3
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
4
Online Food: Zomato नंतर Swiggy वरुनही ऑनलाइन जेवण मागवणं पडेल महागात, जीएसटीचाही परिणाम दिसणार
5
"डीजेमुळे वादनच झालं नाही", पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत आला अत्यंत वाईट अनुभव, सौरभ गोखले म्हणाला...
6
घरातल्या एसीचा भयानक स्फोट; पती-पत्नीसह चिमुकल्या मुलीचा मृत्यू, मुलाची प्रकृती गंभीर
7
Ganesh Visarjan: मुंबईमध्ये २२ वर्षांत पहिल्यांदाच मोजला नाही विसर्जनाचा ‘आवाज’
8
१०० रुपये ते ५० कोटींचा मालक... शुभमन गिल क्रिकेटशिवाय 'या' २० ठिकाणांहून कमवतो बक्कळ पैसा
9
मुंबई महापालिका: महापौरपद, स्टँडिंग कमिटी भाजपला पाहिजे!
10
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
11
उत्पन्न कमी असले तरीही चिंता नाही! 'या' १० स्मार्ट टिप्स वापरुन तुम्ही व्हाल कोट्यधीश
12
'नेटवर्क्ड ब्लू वॉटर फोर्स'..! २०० हून अधिक युद्धनौका, पाणबुड्यांसह भारतीय नौदलाचा जबरदस्त प्लॅन
13
आजचे राशीभविष्य - ८ सप्टेंबर २०२५; गुंतवणूक करताना सावध राहा, वाणीवर संयम ठेवा!
14
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
15
...पण घर सोडणार नाही, असं ते का म्हणताहेत? शहरांची ही मोठी शोकांतिका
16
Maratha Reservation: दसरा मेळाव्यात सरकारविरोधात...; हैदराबाद गॅझेटवरून जरांगेंचा सरकारला इशारा
17
GST Updates: रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त; कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार
18
Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?
19
"मी 'सिंगल मदर' नाही...", एक्स पतीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री; ईशा देओलची पहिली प्रतिक्रिया
20
दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी; आवास योजनेतील घरांच्या किमती २० टक्क्यांनी कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 11:08 IST

जन्माष्टमीच्या मुहूर्तावर सिडकोच्या ९०२ सदनिकांची सोडत.

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई :  विविध प्रकल्पांतील शिल्लक राहिलेल्या ९०२ घरांच्या विक्रीसाठी  सिडकोने योजना जाहीर केली आहे. यात पंतप्रधान आवास योजनेतील २१३ घरांचा समावेश आहे.  या घरांच्या किमती २० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय सिडकोच्या संबंधित विभागाने घेतला आहे.  या योजनेत  खारघरमधील वास्तुविहार-सेलिब्रेशन, स्वप्नपूर्ती आणि व्हॅलिशिल्प या जुन्या प्रकल्पांतील ६८९ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. जन्माष्टमीच्या मुहूर्तावर या योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे.

मागील पाच वर्षांत सिडकोच्या माध्यमातून विविध घटकांसाठी जवळपास पंचवीस हजार घरांची निर्मिती केली आहे.  तर पुढील चार-पाच वर्षांत आणखी ८७ हजार घरे प्रस्तावित आहेत. त्यांपैकी ३० हजार घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. असे असले तरी जुन्या प्रकल्पातील अनेक घरे विविध कारणांमुळे विक्रीविना पडून आहेत. त्यामुळे सिडकोची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक अडकून पडली आहे. या पार्श्वभूमीवर नवीन गृहयोजना जाहीर करण्याअगोदर शिल्लक घरांचा निपटारा करण्याचा निर्णय सिडकोने घेतल्यामुळे सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळेल. 

संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरीकृष्ण जन्माष्टमीपासून ९०२ घरांची योजना सुरू केली जाणार आहे. यात  कळंबोली, खारघर व घणसोली या नोडमधील पंतप्रधान आवास योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ३८ व सर्वसाधारण प्रवर्गासाठी १७५ अशा  एकूण २१३ सदनिकांचा समावेश आहे. तसेच खारघरमधील गृहसंकुलातील एमआयजी आणि एचआयजी प्रवर्गासाठी बांधलेल्या ६८९ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. विशेष म्हणजे ६ ऑगस्ट रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याचे सिडकोच्या संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :cidcoसिडको