शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

महामुंबईतील सहा मेट्रो मार्गांना १९२ कोटींचा बूस्टर, भूसंपादन वेगाने होणार

By नारायण जाधव | Updated: August 26, 2022 15:40 IST

प्रकल्पाच्या मंजूर वित्तीय आराखड्यानुसार प्रकल्पावरील केंद्रीय कराच्या ५० टक्के व राज्य शासनाचे कर १०० टक्के, तसेच जमिनीची किंमत याकरिता हे कर्ज दिले आहे. हे सर्व कर्ज एमएमआरडीएच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

नवी मुंबई - राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने सत्तेत आल्यानंतर महामुंबईतील वाहतूक प्रकल्पांना गती देण्याचा आपला वेग अधिक तीव्र केला आहे. यापूर्वी बहुचर्चित बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मार्गातील भूसंपादनाचे अडथळे दूर केल्यानंतर आता महामुंबईतील सहा मेट्रो मार्गांसाठी १९२ कोटींचे बिनव्याजी कर्ज वितरित करण्याचा निर्णय बुधवारी घेतला.

प्रकल्पाच्या मंजूर वित्तीय आराखड्यानुसार प्रकल्पावरील केंद्रीय कराच्या ५० टक्के व राज्य शासनाचे कर १०० टक्के, तसेच जमिनीची किंमत याकरिता हे कर्ज दिले आहे. हे सर्व कर्ज एमएमआरडीएच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. यामुळे मेट्रो मार्गांचे भूसंपादन वेगाने होऊन कामांना आता अधिक गती मिळणार आहे.

या मार्गांचा आहे समावेश

* दहिसर, पूर्व ते डीएन नगर मेट्रो मार्ग क्रमांक २ अ साठी चालू अर्थसंकल्पात ७५ कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यापैकी ४५ कोटी रुपये वितरीत केले आहेत.* डीएन नगर ते मंडाळे या मेट्रो मार्ग क्रमांक २ ब साठी चालू अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यापैकी ३० कोटी रुपये प्रदान केले आहेत.* वडाळा-घाटकोपर-मुलुंड-कासारवडवली मेट्रो मार्ग क्रमांक ४ साठी चालू अर्थसंकल्पात ८० कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यापैकी ४८ कोटी रुपये दिले आहेत.* ठाणे-कल्याण-भिवंडी या मेट्रो मार्ग क्रमांक ५ साठी चालू अर्थसंकल्पात ३५ कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यापैकी २१ कोटी रुपये इतकी एमएमआरडीएस दिले आहेत.* स्वामी समर्थनगर-जोगेश्वर-विक्रोळी मेट्रो मार्ग क्रमांक ६ साठी चालू अर्थसंकल्पात ४५ कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यापैकी २७ कोटी रुपये वितरित केले आहेत.* दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो मार्ग क्रमांक ७ अ आणि ९ साठी चालू अर्थसंकल्पात ३५ कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यापैकी २१ कोटी रुपये दिले आहेत.

कोविडमुळे आर्थिक गाडा रुतलेला असतानाही मिळणाऱ्या या बिनव्याजी कर्जामुळे या मार्गांच्या जमीन संपादनास गती मिळून त्यांच्या कामांना लवकर सुरुवात होईल, असा राज्य शासनास विश्वास आहे. 

टॅग्स :Metroमेट्रोMumbaiमुंबईNavi Mumbaiनवी मुंबई