शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

महामुंबईतील सात मेट्रो मार्गांना १६६ कोटींचे बिनव्याजी दुय्यम कर्ज

By नारायण जाधव | Updated: March 22, 2023 15:18 IST

एमएमआरडीएलाच हे कर्ज वेळोवेळी देण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महामुंबई क्षेत्रात मुंबई महानगर प्राधिकरणाकडून विविध मेट्रो मार्गांचे काम वेगाने सुरू आहे. आता मार्च अखेर यातील सात मेट्रो मार्गांच्या कामांना आणखी वेग देण्यासाठी नगरविकास विभागाने बिनव्याजी दुय्यम कर्जाचा १६६ कोटींचा डोस मंगळवारी वितरित केला आहे. एमएमआरडीएलाच हे कर्ज वेळोवेळी देण्यात येत आहे.

यानुसार आता मेट्रो मार्ग २ अ अर्थात दहिसर-डीएननगरसाठी ३० कोटी, मेट्रो मार्ग २ ब अर्थात डीएननगर-मंडाळेसाठी २० कोटी, मेट्रो मार्ग क्रमांक ४ अर्थात वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवलीसाठी ३२ कोटी, मेट्रो ५ अर्थात ठाणे-भिवंडी-कल्याणसाठी १४ काेटी, मेट्रो क्रमांक ६ अर्थात स्वामी समर्थनगर-जोगेश्वरी-विक्रोळीसाठी १८ कोटी, मेट्रो मार्ग क्रमांक ६ अंधेरी-दहिसरसाठी ३८ कोटी आणि मेट्रो मार्ग क्रमांक ९ दहिसर-मीरा-भाईंदरसाठी १४ कोटी असे एकूण १६६ कोटी रुपये मंगळवारी वितरित केले आहेत.

मेट्रो प्रकल्पांचे बांधकाम सुरू असेपर्यंत हे दुय्यम बिनव्याजी कर्ज टप्प्याटप्प्याने देण्यात येत आहे.मेट्रो मार्गांसाठी लागणारे केंद्रीय करांच्या ५० टक्के आणि स्थानिक करांच्या १०० टक्के मोबदला या कर्जाच्या माध्यमातून मदत म्हणून बिनव्याजी दुय्यम कर्जाद्वारेे एमएमआरडीएला देण्यात येत आहेत.

टॅग्स :Metroमेट्रो