शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१६ कोटींचा बनावट इनपुट टॅक्स घोटाळा उघड; GST विभागाची कारवाई, व्यावसायिकाला अटक

By नारायण जाधव | Updated: September 24, 2022 14:37 IST

बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा करणाऱयांवर अंकुश ठेवण्यासाठी महाराष्ट्र जीएसटी अन्वेषण विभागाने जोरदार मोहीम सुरू केली आहे.

नारायण जाधव नवी मुंबई : प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारच्या खरेदी विक्रीचा व्यवहार न करता तब्बल ८८. ८४ कोटींच्या बनावट खरेदी विक्रीच्या बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडीट मिळविणाऱया पुण्यातील मे.सनराईज टूर्स ऍण्ड ट्रव्हल्स आणि सनराईज केमिकल्स या कंपनीच्या कार्यालयावर महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर अन्वेषण विभागाने छापा मारुन १५.९९ कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिटचा घोटाळा उघडकीस आणला आहे. या कारवाईनंतर महाराष्ट्र वस्तु व सेवाकर अन्वेषण विभागाने अधिक तपास करत सदर कंपनीच्या मालकाला अटक केली आहे. महाराष्ट्र वस्तु व सेवाकर अन्वेषण विभागाच्या वतीने या आर्थिक वर्षात आतापर्यंत अशाच प्रकारच्या कारवाया करुन ४३ जणांना अटक केली आहे.  

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या अन्वेषण पथकाकडुन बोगस बिलासंदर्भात विशेष तपासणी मोहीम सुरु असताना पुण्यातील मे.सनराईज टूर्स ऍण्ड ट्रव्हल्स, सनराईज मिल मेल, सनराईज केमिकल्स या कंपनीच्या आर्थिक व्यवहाराबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे जीएसटी अन्वेषण विभागाकडुन या कंपनीच्या बोगस बिलासंदर्भात तसेच करचोरी विरोधात विशेष अन्वेषण कारवाई सुरू केली होती. या तपासणीत सदर कंपनीकडुन प्रत्यक्षात खरेदी विक्रीचा व्यवहार झाला नसल्याचे आढळून आले. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या अन्वेषण पथकाने याबाबत केलेल्या सखोल तपासणीत सदर कंपनीने ८८. ८४ कोटीपेक्षा अधिकच्या खोट्या खरेदी देयकांद्वारे १५.९९ कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविल्याचे आढळले.  

त्यानंतर महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अन्वेषण विभागाने मे.सनराईज टूर्स ऍण्ड ट्रव्हल्स, सनराईज मिल मेल, सनराईज केमिकल्स या कंपनीचे मालक हिरेन परेश पारेख यांना २३ सफ्टेंबर रोजी अटक केली. पारेख याला पुणे येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदरची कारवाई पुणे राज्यकर सहआयुक्त दीपक भंडारे, राज्यकर उपायुक्त (अन्वेषण) सुधीर चेके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक राज्यकर आयुक्त श्रीकांत खाडे, ऋषीकेश अहिवळे, प्रदीप कुलकर्णी व अन्वेषण विभागातील राज्यकर निरीक्षक यांच्या पथकाने पार पाडली.  

बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा करणाऱयांवर अंकुश ठेवण्यासाठी महाराष्ट्र जीएसटी अन्वेषण विभागाने जोरदार मोहीम सुरू केली आहे. कर चुकवेगिरी करणाऱयांना शोधुन काढण्यासाठी जीएसटी अन्वेषण विभागाकडून विशेष तपासणी मोहिम हाती घेण्यात येत आहे. या विशेष मोहिमेच्या माध्यमातून राज्य जीएसटी अन्वेषण विभागाने २०२२ या वर्षात कर चुकविगिरीच्या प्रकरणामध्ये एकुण ४३ जणांना अटक केली आहे. येत्या काळात जीएसटीमध्ये कर चुकवेगिरी करणाऱया तसेच इनपुट टॅक्स क्रेडिट बाबत फसवणुक करणाऱया विरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पुणे राज्यकर सहआयुक्त दीपक भंडारे यांनी सांगितले.

टॅग्स :GSTजीएसटी