शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ४०८ शहरे स्मार्ट करण्यासाठी नियोजन विभागाचा १५०० कोटींचा बूस्टर

By नारायण जाधव | Updated: April 1, 2023 15:40 IST

२७ महापालिकांसह ३८१ नगरपालिकांचा समावेश : नियोजन विभागाने घेतला पुढाकार

नवी मुंबई - राज्यातील ४५.२३ परिसराचे नागरीकरण झालेले आहे; मात्र यातील अनेक शहरांत पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यातच जिल्हा वार्षिक योजनांत शहरी लाेकसंख्येचे पाहिजे तसे प्राधान्य दिले जात नाही. यामुळे संयुक्त राष्ट्रांनी श्वाश्वत विकासासाठी हरित आणि राहण्यायोग्य शहरे करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील शहरांना भरीव मदत करण्याचा निर्णय नगरविकास विभागाप्रमाणेच नियोजन विभागानेही गेल्यावर्षी घेतला होता. आता एक वर्षाने उशिराने का होईना नियोजन विभागाने राज्यातील ४०८ शहरांना १५०० कोटी रुपयांची मदत दिली आहे.

यात २७ महापालिकांना एक हजार कोटी, तर ३८१ नगरपालिका/नगरपंचायतींच्या शहरांना ५०० कोटींचे अनुदान देण्यात येणार आहे.या निधीतून या शहरांमध्ये रस्ते, दिवाबत्तीसह पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, पायाभूत सुविधांची कामे करणे सोपे होणार आहे.जिल्हाधिकारी, आयुक्त, मुख्याधिकारी यांचा समावेश असलेली समिती त्या-त्या शहरांकडून आलेल्या प्रस्तावांची छाननी करून त्यांना मान्यता देऊन त्यानुसार निधी वितरित करणार आहे.

मान्यतेसाठी या बाबी तपासणारसंबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची वित्तीय परिस्थिती, कामाची गरज आणि प्राथमिकता, भौगोलिक परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती, शहरीकरणाचा दर, दळणवळण साधनांचा विकास, हागणदारीमुक्त व स्वच्छ शहरांची निर्मिती.

ही १३ कामे करता येणारनियोजन विभागाने दिलेल्या या निधीतून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना ही १३ कामेच करता येणार असून, तीसुद्धा स्वमालकीच्या जागेवर करायची आहेत. यात पाणीपुरवठा व मलनिस्सारण वाहिन्यांची कामे, प्रमुख नागरी मार्ग, नाल्यांचा विस्तार, पथदिवे, हायमास्ट बसविणे, पर्जन्य जलवाहिन्या बांधणे, समाजमंदिर, सभागृह, व्यापारी संकुल, वाचनालय बांधणे, शौचालये आणि मुताऱ्या बांधणे, मोकळ्या जागेच्या उद्यान, मैदानात रूपांतर करणे, त्यांचा विस्तार करणे, सार्वजनिक मालकीच्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे, नवीन प्रशासकीय इमारत बांधणे किंवा तिचा विस्तार करणे, बगीचे विकसित करणे, त्यात सुधारणा करणे, स्मशानभूमी विकसित करणे, हरितपट्टे, अमृत वन विकसित करण्यासह इतर नागरी-पायाभूत सुविधा विकसित करता येणार आहेत.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटी