शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जाहिरात शुल्काची १५ लाखांची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 03:41 IST

पालिकेची परवानगी नाही : परवाना विभागाने मागितला एनएमएमटीकडून तपशील

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील ५०० बसथांब्यांवर जाहिरात प्रसिद्ध करण्याचा ठेका देण्यात आला आहे. या जाहिरातींसाठी परवाना विभागाला शुल्क भरणे आवश्यक आहे; परंतु ठेकेदार व प्रशासनाने शुल्क भरलेले नसून, जवळपास १५ लाख रुपयांचा महसूल बुडविला आहे. या वसुलीसाठी परवाना विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत.

शहरामध्ये जाहिरात फलक लावण्यापासून व्यवसाय सुरू करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी पालिकेचा परवाना घेणे बंधनकारक आहे; परंतु हे नियम धाब्यावर बसवून विनापरवाना व्यवसाय करण्याची व फुकटची जाहिरातबाजी करण्याकडे सर्वांचाच कल आहे. परवाना विभागाच्या दुर्लक्षामुळे पालिकेचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. शहरामधील एनएमएमटीच्या बसथांब्यावरही जाहिराती लावण्यात येतात. यासाठी दोन ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. बीओटी तत्त्वावर थांबे उभारणे त्यांची दहा वर्षे देखभाल करणे व जाहिरातीपोटी येणाऱ्या शुल्कातून एनएमएमटीला भाडे देण्याचा एक ठेका आहे. प्रशासनाने उभारलेल्या बसथांब्यावर जाहिराती प्रसिद्ध करण्याचा दुसरा ठेका दिलेला आहे. दोन्ही ठेकेदारांनी जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी पालिकेच्या परवाना विभागाची परवानगी घेऊन त्यांचे शुल्क भरणे बंधनकारक आहे; पण अनेक वर्षांमध्ये हे शुल्क भरण्यात आलेले नाही. बसथांब्यावरील जाहिरातीचे शुल्क मिळत नसल्याची गोष्ट प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. जवळपास १५ लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे. हा महसूल वसूल करण्यासाठी परवाना विभागाने एनएमएमटीकडे पाठपुरावा सुरू केला आहे. परिवहनने ही जबाबदारी ठेकेदाराची असल्याचे स्पष्ट केले आहे. परिवहनने ठेकेदारांशी काय करार केला आहे. परवानगीची जबाबदारी नक्की कोणाची आहे, याची शहानिशा करण्यासाठी कराराची प्रत प्रशासनाने मागितली आहे. यानंतर बुडालेला महसूल कोणाकडून वसूल करायचा हे निश्चित केले जाणार आहे.अधिकाºयांची लपवा-छपवीपरवाना विभागामध्येही अनागोंदी कारभार सुरू आहे. फुकटच्या जाहिराती लावणाºयांवर ठोस कारवाई केली जात नाही. परवाना विभागाचे प्रमुख प्रकाश वाघमारे यांच्याशी संपर्क साधला; परंतु वारंवार फोन करूनही त्यांचा काहीही प्रतिसाद मिळाला नाही.फुकटच्या जाहिरातीएनएमएमटीच्या थांब्यावर जाहिरात लावण्याचा ठेका देण्यात आला आहे; परंतु अनेक राजकीय पक्षाचे नेते व पदाधिकारी ठेकेदाराच्याही परवानगीशिवाय फुकट जाहिराती लावत असतात. फुकट प्रसिद्ध करणाºयांवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :AdvertisingजाहिरातNavi Mumbaiनवी मुंबई