शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

१२ वर्षीय मुलीचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू, डास उत्पत्तीच्या ठिकाणी फवारणी नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 07:31 IST

पाच दिवसांपूर्वी ताप आल्याने तिला वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल केले होते.

नवी मुंबई : डेंग्यूसदृश आजाराने नेरूळमधील १२ वर्षीय मुलीच्या मृत्यूची घटना शुक्रवारी घडली. पाच दिवसांपासून तिच्यावर पालिका रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, मेंदूशी संबंधित आजाराने तिचा मृत्यू झाल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पलक जाखवाडिया असे मृत मुलीचे नाव आहे. ती पालिकेच्या शाळेत सहावीत शिकत होती. पाच दिवसांपूर्वी ताप आल्याने तिला वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल केले होते.

यामुळे तिला आयसीयूमध्ये दाखल केले होते. अखेर शुक्रवारी संध्याकाळी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.  तिचा मृत्यू मेंदूशी संबंधित त्रासाने झाला असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे; परंतु पलक राहत असलेल्या बांचोली मैदान परिसरात मागील महिन्याभरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. पलक हिलाही डेंग्यू झाला होता. मात्र आरोग्य विभागाचे अपयश झाकण्यासाठी ही बाब दडपली जात असल्याचा आरोप मनसे उपशहराध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी केला आहे. 

अधिकाऱ्यांकडून दुर्लक्षपरिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणारी वास्तू अधिकाऱ्यांकडून दुर्लक्षित राहत असल्याने परिसरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचाही आरोप म्हात्रे  यांनी केला. तीसहून अधिक वर्षे पडीक अवस्थेत असलेल्या या वास्तूत मोठ्या प्रमाणात घाण, पाणी साचली असून त्या ठिकाणी धुरीकरण, फवारणीदेखील होत नाही. तक्रार करूनही ही वास्तू जमीनदोस्त केली जात नसल्याने ते ठिकाण डासउत्पत्तीचे केंद्र बनत आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई