शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

नवी मुंबईत उभे राहणार 12 मजल्यांचे देखणे महाराष्ट्र भवन, नियोजित वास्तूचे सादरीकरण, सुसज्ज सुविधांची रेलचेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 12:25 IST

Navi Mumbai: महाराष्ट्र शासनाकडून नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकासमोर बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनाची नियोजित इमारत ही १२ माळ्यांची राहणार असून त्यात सर्व सुविधा असणार आहेत.

नवी मुंबई - महाराष्ट्र शासनाकडून नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकासमोर बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनाची नियोजित इमारत ही १२ माळ्यांची राहणार असून त्यात सर्व सुविधा असणार आहेत. या नियोजित महाराष्ट्राच्या वास्तूचे सादरीकरण सिडकाेचे उपाध्यक्ष  व व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्या दालनात करण्यात आले. याचा पाठपुरावा करणाऱ्या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, सिडकोचे  सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल, कैलास शिंदे यावेळी उपस्थित होते.

नियोजित महाराष्ट्र भवनामध्ये व्हीआयपी रूम, तसेच लोकप्रतिनिधीसोबत येणारे त्यांचे वाहनचालक किंवा कर्मचाऱ्यांकरिता ही रूम असणार आहे. त्याचबरोबर विविध भागांतून येणाऱ्या विद्यार्थी, अभ्यागतांसाठी विश्रांती कक्ष, ई- लायब्ररी, कॉन्फरन्स हॉल, फूड प्लाझा अशा विविध प्रकारच्या सुविधा या महाराष्ट्र भवनामध्ये पाहावयास मिळणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र भवनाचा प्रश्न हा लवकरात लवकर मार्गी लागल्यामुळे अशी वास्तू प्रथमच राज्यामध्ये उभी राहणार आहे.  शहरवासीयांना सिडकोमार्फत वाशी येथे राज्यनिहाय भवन निर्मितीसाठी भूखंड उपलब्ध करून दिले गेले. 

१०० कोटींची तरतूदनियोजित महाराष्ट्र भवनासाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये वित्तमंत्री असताना सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १०० कोटींच्या तरतुदीची घाेषणा केली होती. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सहकार्य केले आहे. 

 महाराष्ट्र भवनाच्या प्रथमदर्शनी भागामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने भवनामध्ये प्रवेश करताच छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन होऊन त्यानंतरच महाराष्ट्राची आठवण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 राज्यनिहाय दिल्या गेलेल्या सर्व राज्यांची भवने नवी मुंबई वाशी येथे उभी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अशा विविध ठिकाणांहून येणाऱ्या नागरिकांना दिलासा. 

लढ्याला यशज्या महाराष्ट्र भवनासाठी २०१४ पासून जो लढा चालला होता त्याला आज पूर्णविराम लागला असून या महाराष्ट्र भवनाचा फायदा हा नवी मुंबईलाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्याला होणार असल्याचे आमदार म्हात्रे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMaharashtraमहाराष्ट्र