शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

CoronaVirus News: जन्माष्टमीची ११८ वर्षांची परंपरा खंडित; कोरोनाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 00:05 IST

ब्रिटिशांना न जुमानता घणसोलीत साजरा व्हायचा उत्सव

- अनंत पाटील नवी मुंबई : स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास असलेल्या घणसोली गावातील ११८ वर्षांपासून कृष्ण जन्माष्टमीचा अर्थात, दहीकाल्याच्या उत्सव अगदी अखंडितपणे साजरा केला जातोय, परंतु या वर्षी कोरोनामुळे ही परंपरा खंडित झाली आहे. ग्रामस्थांनी अगदी साध्या व तितक्याच सुरक्षित पद्धतीने आठ-दहा लोकांच्या उपस्थितीत या वर्षी कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला. गावकीचे अध्यक्ष चेतन पाटील यांनी मानाची हंडी फोडून पारंपरिक उत्सवाचा सोपस्कार पूर्ण केला.खारी-कळवे बेलापूर पट्टीत १९३० ते १९३२ कालावधीत मिठाचा सत्याग्रह झाला होता. या सत्याग्रहात सहभागी झालेल्या अनेक स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी सहभाग घेतला होता. याच वेळी अनेक नेत्यांनी घणसोली गावातील छावणीला भेट दिली होती, तर अनेक स्वातंत्र्य सैनिक ब्रिटाशांना हुलकावणी देण्यासाठी घणसोली गावाचा आश्रय घेतला होता. या सर्व पार्श्वभूमीवर घणसोली गावाला एक ऐतिहासिक ओळख प्राप्त झाली आहे. इंग्रजांचा विरोध असतानाही या गावात शिनवार कमळ्या पाटील यांनी सर्वप्रथम श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सुरू केला. १९०२ साली घणसोली गावात शिनवार कमळ्या पाटील यांनी राहत्या घरी गोकुळाष्टमीच्या उत्सवाला सुरुवात केली होती. त्यानंतर, काही वर्षांनी हा उत्सव घणसोली गावकीच्या हनुमान मंदिरात होऊ लागला. या ऐतिहासिक परंपरेला या वर्षी ११८ वर्षे पूर्ण झाली आहेत. शिनवार कमळ्या पाटील यांच्या चौथ्या पिढीने ही परंपरा अबाधित ठेवली आहे, परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या वर्षी या ऐतिहासिक परंपरेला ब्रेक लागला आहे. ग्रामस्थांनीही सरकारच्या आदेशानुसार या वर्षी अगदी साध्या पद्धतीने दहीकाल्याचा उत्सव साजरा केला. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता केवळ चार ते पाच जणांच्या उपस्थितीत मंदिरातच केवळ सहा फुट उंचीवर लावण्यात आलेली दहीहंडी फोडली. टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी मंडळीनी अभंग गात छत्रपती शिवाजी महाराज तलावाजवळ या धार्मिक उत्सवाचा समारोप केला. यावेळी गावकीचे अध्यक्ष चेतन पाटील, सरचिटणीस मिलिंद पाटील, बाबुराब बुवा पाटील, एकनाथ रानकर, दिनानाथ पाटील, यशवंत पाटील आदी उपस्थित होते.नवी मुंबईतील नावाजलेले ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथकाने यंदाच्या वर्षी एका अनोख्या उपक्रमासोबत दहीहंडी साजरी केली.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहीहंडी उत्सव साजरा न करता, या गोविंदा पथकाने ऐरोली कोळीवाडा परिसरातील सर्व कुटुंबीयांच्या सुरक्षेचा विचार करून घरोघरी कोरोना किटचे वाटप करून, अनोख्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला.

टॅग्स :Dahi Handiदहीहंडी