शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
2
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
3
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
6
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath
7
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
8
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
9
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
10
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
12
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
13
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
14
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
15
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
16
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
17
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
18
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
19
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
20
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता

नवी मुंबईतील गणेश मंदिरातून 11 किलो चांदीची चोरी

By admin | Published: November 11, 2016 2:44 PM

ऑनलाइन लोकमत नवी मुंबई, दि. 11 - करावे गावातील प्रसिद्ध गणेश मंदिरात शुक्रवारी पहाटे चोरीची घटना घडली आहे. केवळ ...

ऑनलाइन लोकमत

नवी मुंबई, दि. 11 - करावे गावातील प्रसिद्ध गणेश मंदिरात शुक्रवारी पहाटे चोरीची घटना घडली आहे. केवळ तीन मिनिटांमध्ये मंदिरातील मौल्यवान वस्तू आणि दानपेटीवर हात साफ करुन चोरटे पसार झाले आहेत. मंदिराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी जवळपास 11 किलो चांदीसह दोन मूर्ती आणि दानपेटीतील सुट्टे पैसे वळगता सर्व रक्कम चोरी केली आहे. चोरीची ही दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत.  
 
गावदेवी तलावाजवळ 1982 साली गणेश मंदिर बांधण्यात आले.  फेब्रुवारी महिन्यातच मंदिराचा जिर्णोद्धार करुन ग्रामस्थांनी मंदिराच्या गाभा-यावर 11 किलो वजनाच्या चांदीची कमान बसवली. शिवाय, मुख्य गणेश मूर्तीच्या शेजारी रिद्धी आणि सिद्धीची चांदीच्याच मूर्तींची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली होती.
 
त्यानंतर शुक्रवारी पहाटे 2 वाजून 31 मिनिटांनी ही चोरीची घटना घडली आहे. यातील एक चोराने कटावणीच्या सहाय्याने चांदीची कमान काढली,तर दुस-याने दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील चिल्लर वगळता सर्व नोटा पिशवीमध्ये भरल्या. केवळ तीन मिनिटांमध्ये या चोरट्यांनी मंदिरात हात साफ केला आहे. याप्रकरणी एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 
 
(फोटो, व्हिडीओ - नामदेव मोरे)
 
 
 
 
 

https://www.dailymotion.com/video/x844hie