शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या घरांसाठी १ लाख ३४ हजार अर्ज; मुदतवाढ नाही, मात्र अर्ज नोंदणी सुरूच राहणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 11:05 IST

५४ हजार ७६८ ग्राहकांनी केले शुल्क अदा; पुढच्या टप्प्यासाठी पात्रता सिद्ध

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : सिडकोच्या घरांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत शुक्रवारी संपत आहे. त्यासाठी पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही. मात्र, या प्रक्रियेचा दुसरा टप्पा म्हणजेच घरांची निवड करण्याच्या मुदतीपर्यंत ग्राहकांना ऑनलाइन अर्ज नोंदणी करता येणार आहे. एकूणच मुदत संपल्यानंतरही संकेतस्थळावरील अर्ज नोंदणीचा पर्याय खुलाच ठेवण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यामुळे अद्याप घरांसाठी अर्जनोंदणी न केलेल्या ग्राहकांना पसंतीचे घर घेण्याची आणखी एक संधी उपलब्ध आहे. सिडकोच्या घरांसाठी आतापर्यंत १ लाख ३४ हजार अर्ज आले आहेत.

‘माझे पसंतीचे सिडको घर’ योजनेतील घराच्या नोंदणीसाठी १० जानेवारी ही अखेरची मुदत संपत आहे. या प्रक्रियेला तीनदा मुदतवाढ देऊनही सिडकोने घरांच्या किमती जाहीर केल्या नव्हत्या; परंतु अर्जनोंदणीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना म्हणजे  मंगळवारी रात्री प्रकल्पनिहाय २६ हजार घरांच्या किमती जाहीर केल्या. त्यामुळे  दोन दिवसांत अर्ज भरायचा कसा, या विवंचनेत असलेल्या ग्राहकांना सिडकोने दिलासा दिला. आतापर्यंत अर्जनाेंदणी करून शुल्क अदा केलेल्या ग्राहकांसाठी ११ जानेवारीपासून  घरांचा पर्याय निवडण्याचा पुढचा टप्पा खुला होणार आहे.

ग्राहकांनी शुल्क केले अदा

९ जानेवारीपर्यंत सिडकोच्या घरासाठी १,३३,९७५ ग्राहकांनी ऑनलाइन अर्जनोंदणी केली आहे. त्यापैकी ५४ हजार ७६८ ग्राहकांनी शुल्क अदा करून ११ जानेवारीपासून खुल्या होणाऱ्या घर निवडीच्या पुढच्या टप्प्यासाठी पात्रता सिद्ध केली आहे.

टॅग्स :cidcoसिडकोHomeसुंदर गृहनियोजनNavi Mumbaiनवी मुंबई