शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

विकासासाठी १०० कोटींचा प्रस्ताव तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 1:58 AM

तत्त्वत: मान्यता । कर्जतच्या नगराध्यक्षांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट

कर्जत : कर्जत नगरपरिषद हद्दीत सुमारे १०० कोटी रुपयांच्या महत्त्वपूर्ण विकासकामांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्याचे नगरविकास व जलसंधारण मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सर्व प्रस्ताव सादर केले. यावेळी त्यांच्यासमवेत माजी शिवसेना संपर्क प्रमुख संजय मोरे, युवा सेना रायगड जिल्हाधिकारी मयूर जोशी, माजी नगरसेवक संतोष पाटील, सामाजिक कार्यकर्ते केतन जोशी उपस्थित होते.

वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कर्जत शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीलगतचा परिसर विकसित करण्यासाठी एकूण चार चौपाट्यांचे बांधकाम प्रस्तावित केले आहे. नदीला १२ ठिकाणी जोडणाºया सांडपाणी नाल्यावर ई-एसटीपीचे बांधकाम प्रस्तावित असून त्याद्वारे नैसर्गिकरीत्या सांडपाणी शुद्ध करून झाडांसाठी पूर्ण प्रक्रिया करण्याचे नियोजन केले आहे. नदीत घाटाचे बांधकामही प्रस्तावित करण्यात आलेले आहे व शहरातून जाणाºया नदीलगत उर्वरित ठिकाणी संरक्षण भिंत व गाबियन वॉलचे बांधकाम प्रस्तावित केलेले आहे. अशा सर्व कामांसाठी ४४ कोटी १२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

उल्हास नदीवरील सध्या अस्तित्वात असलेला पूलवजा बंधाºयाच्या लोखंडी प्लेट नादुरुस्त झाल्या असून, त्यामधून पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे प्लेट्सऐवजी यांत्रिकी दरवाजे बसवण्याच्या सुमारे ३ कोटी रुपयांच्या कामाला तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. हे काम जलसंधारणमधून करण्यात येणार आहे. या यांत्रिकी दरवाजामुळे नदीचे पाणी अडविणे फार सोपे होणार आहे. पर्यटन निधीअंतर्गत उल्हास नदीवर नाना मास्तरनगर येथे रबर डॅम प्रस्तावित करण्यात आला असून त्यामुळे नाना मास्तर नगर ते अमराईपर्यंत नदीत पाण्याचा साठा उपलब्ध राहील. यामुळे नदीपात्रात बारामाही पाणी राहून पर्यटक, नागरिकांना आकर्षण केंद्र होण्यास मदत होणार आहे. कर्जतमध्ये २४७ पाणीपुरवठा योजना राबविण्यासही तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात चोवीस तास पाणीपुरवठा नळाद्वारे होईल. यामध्ये पाण्याचे मीटर आॅटोमॅटिक पंप चालू-बंद होणे व एचडीएफ पाईपद्वारे पाणीपुरवठा या गोष्टी अंतर्भूत आहेत. यामुळे पाण्याची बचत होऊन पाणीपुरवठा योजनेचा खर्च कमी होऊन उत्पन्न वाढणार आहे. या कामासाठी महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान राज्य स्तरातून सुमारे २२ कोटींचे अंदाजपत्रक बनविण्यात आले आहे.भुयारी मार्गास मान्यतागुंडगे भिसेगांव येथील नागरिकांना कर्जत बाजारपेठेमध्ये येण्यासाठी पाच किलोमीटरचा वळसा घालून महामार्गावर यावे लागते. त्याऐवजी रेल्वे जुने गेट येथे (सब -वे) भुयारी मार्ग करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आलेली आहे. या कामाचे वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सुमारे १५ कोटींचे अंदाजपत्रक बनविले आहे.

टॅग्स :Karjatकर्जतNavi Mumbaiनवी मुंबई