शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

१ प्रशासक, २२ सोसायट्या! सहकार नियमांना हरताळ; नवी मुंबईत अधिनियमाचा भंग झाल्याचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 07:37 IST

नवी मुंबईतील विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या भूमिकेवरही संशयाची छाया निर्माण झाली आहे.

वैभव गायकर

पनवेल - नवी मुंबई विभागीय सहनिबंधक कार्यालयाने १ जानेवारी २०२४ ते १० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १८६ सहकारी गृहनिर्माण संस्थांवर २० प्रशासकांची नेमणूक केल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. मात्र, सहकार कायद्यानुसार एका प्रशासकाची जास्तीत जास्त तीन सोसायट्यांवर, तेही एका वर्षासाठी नियुक्ती करता येते. असे असतानाही एका प्रशासकाकडे  २२ सोसायट्यांची जबाबदारी देण्यात आल्याने सहकार संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७७अ व ७८ चा भंग झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष बसवेकर यांनी या संदर्भात ३ फेब्रुवारी २०२५ रोजी सहकार पणन मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. काही प्रशासकांनी सोसायट्यांचे मालक असल्याप्रमाणे कारभार हाकत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. 

संशयाची गडद छाया प्राथमिक तक्रारीची दखल घेत उपनिबंधक प्रताप पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले असून, चौकशीनंतर अनेक प्रशासकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. प्रशासक नियुक्ती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत असून, नवी मुंबईतील विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या भूमिकेवरही संशयाची छाया निर्माण झाली आहे.

पनवेल व नवी मुंबई परिसरातील गृहनिर्माण संस्थांवर थेट नियंत्रण असलेल्या निबंधक कार्यालयाने प्रशासकांची नावानिशी माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार, एकाच प्रशासकाकडे २२ तर अन्य काही प्रशासकांकडे १६, १५, १४ व १२ सोसायट्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच पाच प्रशासकांकडे प्रत्येकी दहा सोसायट्यांचा कारभार आहे.  

किती सोसायट्यांची जबाबदारी कोणाकडे ?१) शरद मारुती घोलप    २२२) संतोष रामसिंगे    १६ ३) शंकर शेलार    १५४) शिवाजीराव पाटील    १४५) विशाल निंबाळकर    १२६) आनंद म्होळे    १०७) चंद्रकांत शिर्के    १०८) धरमदीप डँग    १०९) प्रतीक मिश्रा    १०१०) ए. बी. जाधव    १०११) शंकर गाडे    ९१२) स्नेहल खेडकर    ८ १३) विधी येणगे    ७१४) विशाल बापू भाईक    ६१५) शंकर मनोहर सकपाळ    ६१६) प्रशांत काळे    ६१७) अक्षय साबळे    ६१८) अदिती कुलकर्णी    ५१९) अतुल गणेश कुलकर्णी    ५२०) गणेश सखाराम सुर्वे    ५

English
हिंदी सारांश
Web Title : One Administrator, 22 Societies! Co-op Rules Broken in Navi Mumbai

Web Summary : Navi Mumbai registrar's office appointed 20 administrators for 186 societies, violating co-op rules. One administrator managed 22 societies, exceeding the limit. Inquiry initiated after a complaint alleged financial irregularities.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई