शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: मोठी बातमी! झायडसच्या 'विराफिन' औषधास परवानगी; कोरोनावर तब्बल ९१ टक्के प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 16:38 IST

CoronaVirus News: झायडस कॅडिलाच्या औषधाला डीजीसीआयची परवानगी; कोरोना रुग्णांच्या उपचारात आता विराफिनचा वापर होणार

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून अतिशय झपाट्यानं वाढत आहे. काल देशात पहिल्यांदा ३ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये आता कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. याशिवाय कोरोना लसीकरणाला गती देण्याचं कामदेखील सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता झायडस कॅडिलानं तयार केलेल्या कोरोनावरील औषधाच्या वापरास ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (डीजीसीआय) परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच झायडस कॅडिला कंपनीच्या विराफिन औषधाचा वापर सुरू होईल. सध्याच्या घडीला देशात कोवॅक्सिन, कोविशील्ड लसींचा वापर सुरू आहे. तर पुढील काही दिवसांत स्पुटनिकची लसदेखील भारतात उपलब्ध होणार आहे. त्यानंतर आता विराफिनच्या वापरासदेखील परवानगी मिळाली आहे.सध्या देशात दोन लसींचा वापर सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लसीकरण महत्त्वाचं ठरत आहे. तर विराफिनचा वापर कोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये करता येईल. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर विराफिनच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यातून हाती आलेले निष्कर्ष उत्तम आहेत. कोरोना रुग्णांच्या उपचारात विराफिनचा वापर केल्यास अवघ्या ७ दिवसांत ९१.१५ टक्के रुग्णांचे आरटी-पीसीआर अहवाल निगेटिव्ह येत असल्याचा दावा झायडसनं केला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना लवकर बरे करण्यात आणि ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वेगानं कमी करण्यात विराफिन उपयोगी ठरेल.ना रेमडेसिविर, ना महागडी औषधे; तरीही रुग्ण होताहेत ठणठणीत बरे!कोरोना रुग्णांना सुरुवातीच्या कालावधीत विराफिन दिलं गेल्यास रुग्ण अधिक लवकर बरा होतो. त्याला होणारा त्रासदेखील कमी होतो, असा झायडस कॅडिला कंपनीचा दावा आहे. हे औषध केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानं देण्यात येईल. ते सुरुवातीला केवळ रुग्णालयांमध्ये उपलब्ध असेल. देशाच्या सध्याच्या घडीला २४ लाख २८ हजार ६१६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल आणि परवा देशात ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानं देशातील आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा ताण आहे. अनेक रुग्णालयांची क्षमता संपली आहे. अशा परिस्थितीत रुग्ण लवकर बरे झाल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होऊ शकतो. त्या दृष्टीनं झायडसच्या विराफिनला मिळालेली परवानगी महत्त्वाची आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या