जिल्हा परिषदेत ध्वज अर्ध्यावर
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
शासकीय दुखवटा, आबांना श्रद्धांजली
जिल्हा परिषदेत ध्वज अर्ध्यावर
शासकीय दुखवटा, आबांना श्रद्धांजलीनाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाने एक दिवसाचा दुखवटा राज्य शासनाने जाहीर केला असून, त्यामुळे काल (दि.१७) मंगळवारी जिल्हा परिषदेच्या आवारातील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात आला होता.सोमवारी (दि.१६) सायंकाळीच उशिरा यासंदर्भात जिल्हा परिषदेला राज्य शासनाचे यासंदर्भात आदेश प्राप्त झाले होते. माजी उपमुख्यमंत्री व ग्रामविकास तसेच गृहमंत्रिपद भूषविलेले आर. आर. पाटील यांचे सोमवारी दुपारी निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक दिवसाचा सरकारी दुखवटा जाहीर केला होता. त्यानुसार सोमवारी सायंकाळी उशिरा जिल्हा परिषदेला हे आदेश प्राप्त झाले. मंगळवारी (दि.१७) महाशिवरात्रीची सुी असूनही जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र महाले यांनी हजेरी लावली. तसेच जिल्हा परिषदेतील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवून आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. (प्रतिनिधी)