सोनीपतच्या हरसाणा गावात युट्यूबर पुष्पा हिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा करत सांगितले आहे की, पुष्पाने आत्महत्या केली नव्हती, तर तिची हत्या करण्यात आली. ही हत्या तिच्या युट्यूबर बॉयफ्रेंड संदीपनेच केल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी संदीपला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
दरम्यान, ५ ऑक्टोबर रोजी हरसाणा गावातील शेतातील एका घरात पुष्पाचा मृतदेह फासावर लटकलेला आढळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पाचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाला. खुनाला आत्महत्येचे रूप देण्यासाठी संदीपने तिचा मृतदेह लटकवला होता. जिंद जिल्ह्यातील रहिवासी असलेली पुष्पा, तिच्या पतीला सोडून युट्यूबर संदीप सोबत हरसाणा गावात राहत होती.पुष्पा संदीपवर लग्नासाठी दबाव आणत होती, पण संदीपने वारंवार नकार दिला. ५ ऑक्टोबर रोजी संदीपने पुष्पाचा गळा दाबून खून केला.
व्हिसेरा रिपोर्ट आणि डॉक्टरांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट एकसारखा होता, ज्यामुळे तिला गळा दाबून मारण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पुष्पाचा युट्यूबर प्रियकर संदीपला अटक केली. सुरुवातीला त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबूल केली.संदीपला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या हत्येत आणखी कोणी सहभागी आहे का? याचा तपास करण्यासाठी संदीपची चौकशी सुरू आहे. पोलीस प्रवक्ते रवींद्र कुमार यांनी या माहितीला दुजोरा दिला.
Web Summary : YouTuber Pushpa's death, initially appearing as suicide, was murder. Her YouTuber boyfriend Sandeep confessed to strangling her after she pressured him for marriage. Police investigation continues.
Web Summary : YouTuber पुष्पा की मौत आत्महत्या नहीं हत्या थी। बॉयफ्रेंड संदीप ने शादी के दबाव में गला घोंटकर हत्या की। पुलिस जांच जारी है, संदीप गिरफ्तार।