शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो स्टेशनवर तरुणांनी घातला गोंधळ, एएफसी गेटवरून उड्या मारत पडले बाहेर, व्हिडीओ व्हायरल    

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 15:35 IST

Delhi Metro News: दिल्ली मेट्रोचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली असताना काही तरुण मेट्रो स्टेशनच्या गेटवरून उड्या मारत बाहेर पडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची पडताळणी करण्यात आली आहे. 

दिल्लीमेट्रोचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली असताना काही तरुण मेट्रो स्टेशनच्या गेटवरून उड्या मारत बाहेर पडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची पडताळणी करण्यात आली आहे.

हा व्हिडीओ दिल्लीतील जामा मशीद मेट्रो स्टेशवरील आहे. १३ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजून २२ मिनिटांनी हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला होता. दिल्ली मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या रात्री शब-ए-बारात असल्याने गर्दी होती. त्यातच स्टेशनवर एकाच वेळी दोन मेट्रो आल्याने एक्झिट गेटवर लोकांची प्रचंड गर्दी झाली. त्याचवेळी एक्झिट गेटने काम करणं बंद केलं. गर्दी अधिक असल्याने बाजूच्या गेटमधून जाण्याची परवानगी लोकांना देण्यात आली.

याचदरम्यान, काही  लोक उड्या मारून गेटच्या बाहेर आले. तसेच गोंधळ घालू लागले. मात्रा काही वेळातच ही गर्दी कमी झाली. तसेच याबाबत कुणीही तक्रार केली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्हायरल होत असलेला व्हिडीओ काही प्रमाणात एडिट करण्यात आलेला आहे. दिल्ली पोलिसांच्या मेट्रो विंगने आपल्याकडे याबाबत आतापर्यंत कुठलीही तक्रारी आलेली  नाही, जर तक्रार आळी तर कायदेशीर कारवाईबाबत विचार करू, असे सांगितले.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबाबत दिल्ली मेट्रोकडून अधिकृत माहितीही समोर आली आहे. डीएमआरसी कॉर्पोरेशन संचारचे प्रमुख कार्यकारी संचालक अनुज दयाल यांनी सांगितले की, सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये काही प्रवासी एएफसी गेट पार करून बाहेर जाताना दिसत आहेत. ही घटना १३ फेब्रुवारी रोजी रात्री जामा मशीद मेट्रो स्टेशनवर घडली.  काही वेळासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती. तर काही प्रवासी गेटवरून उड्या मारून जात होते. तिथे सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचारी पुरेशा प्रमाणात होते. तसे च परिस्थितीही नियंत्रणात होती. तसेच प्रवाशांची ही क्षणिक प्रतिक्रिया होती, असेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :delhiदिल्लीMetroमेट्रो