शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ट्रेन समोरून येत असतानाच रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर ठेवला; अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 21:57 IST

एका व्यक्तीनं रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर ठेवून व्हिडीओ बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

थिरुअनंतपूरमः एका व्यक्तीनं रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर ठेवून व्हिडीओ बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर रेल्वे प्रशासनाची झोप उडाली. पोलिसांनी लागलीच या प्रकरणाचा छडा लावत तिरुपतीमधल्या रामी रेड्डी या व्यक्तीला अटक केली. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यानं हा प्रकार केला होता. तसेच यापूर्वीही त्यांनी टायर, बाइक आणि फटाके रेल्वे रुळावर ठेवून व्हिडीओ बनवले होते. विशेष म्हणजे हा सिलिंडर रेल्वे रुळावर ठेवला असताना रेल्वे वेगानं धावत येऊन त्याला धडकत असल्याचंही त्यानं सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडीओतून पाहायला मिळतं आहे.अशा वेळी जर भरलेला सिलिंडर असता आणि त्याचा स्फोट झाला तर किती मोठी दुर्घटना घडू शकते, याची कल्पनाही आपण करू शकत नाही. रामी रेड्डीचा हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. तसेच रेल्वे ट्रॅकवर टायर, बाइक आणि सिलिंडर ठेवल्याचे व्हिडीओही त्यानं सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.ते सर्व आता पोलिसांनी बॅन केले आहेत. रामी रेड्डीला या कृत्यासाठी रेनिगुंटातल्या आरपीएफ पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा असतो हे त्याला माहीत नसल्याचं तो आता पोलिसांना सांगत आहे. रेल्वे पोलिसांनी रामी रेड्डी विरोधात गुन्हा नोंदवला असून, त्याला पोलीस कोठडीत पाठवलं आहे.