शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

'तो' कोण होता?; लाल किल्ल्यावर धर्मध्वज फडकवणाऱ्या तरुणाची ओळख पटली

By कुणाल गवाणकर | Updated: January 27, 2021 11:01 IST

लाल किल्ल्यात धर्मध्वज फडकवण्यात आल्यानं वादंग; पोलिसांकडून तपास सुरू

नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी बॅरिकेड्स पाडून लाल किल्ल्यात प्रवेश केला. यावेळी अनेक भागांत आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले. लाल किल्ल्यात घुसलेल्या आंदोलकांनी शीखांचा धर्मध्वज फडकावल्यानं वादंग माजला आहे. लाल किल्ल्यात शिरलेल्या आंदोलकांची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे.दिल्लीतील आंदोलकांनी ना तिरंगा हटवला, ना खलिस्तानी झेंडा फडकवलालाल किल्ल्यावर तिरंगा हटवून धर्मध्वज फडकवण्यात आल्याचा दावा काही जणांकडून करण्यात येत आहे. तर काही जण फोटो, व्हिडीओ शेअर करत लाल किल्ल्यावर तिरंगा तसाच फडकत असून त्याशेजारी धर्मध्वज फडकवला गेल्याचा दावा करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून आता आंदोलकांचा शोध घेतला जात आहे. लाल किल्ल्यावर धर्मध्वज फडकवणारी व्यक्ती पंजाबच्या तरण तारण जिल्ह्याची रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे तरुणाची ओळख सांगणारा दावा त्याच्या नातेवाईकांनीच केला आहे. आपल्या नातेवाईकानं धर्मध्वज फडकवल्याचा दावा करणारा व्हिडीओ त्यांनी अभिमानानं पोस्ट केला आहे.दिल्लीत शेतकऱ्यांना भडकवण्याचा आरोप असलेला दिप सिद्धू कोण आहे? त्यानं खरंच भडकावलं?२ मिनिटं २१ सेकंदाच्या व्हिडीओवरून अनेक दावेसोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ २ मिनिटं २१ सेकंदांचा आहे. त्यामध्ये व्हिडीओ फडकवणाऱ्या तरुणाचं नाव जुगराज सिंह असल्याचं सांगितलं जात आहे. तो पंजाबच्या तरण तारणचा रहिवासी आहे. व्हिडीओमध्ये जुगराजचा एक नातेवाईकदेखील दिसत आहे. हा नातेवाईक जुगराजच्या वडील आणि आजोबांचा परिचय करताना दिसत आहे. दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर जुगराजनंच खालसा पंथाचा निशाण साहिब झेंडा फडकावल्याचा दावा करण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये जुगराजचे आजोबा अभिमानानं आपल्या नातवाला आशीर्वाद करताना दिसत आहेत. 

टॅग्स :Red Fortलाल किल्लाFarmerशेतकरी