शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सूत जुळलं! लुडो खेळता खेळता जावयाचं विधवा सासूवर प्रेम जडलं; दोघांना रंगेहाथ पकडलं अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 14:34 IST

लुडो खेळता खेळता जावई विधवा सासूच्या प्रेमात पडला आहे. एवढेच नाही तर हा तरुण तिला गुपचूप भेटायला पोहोचला.

प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. प्रेमाचे भन्नाट किस्सेही अनेकदा समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. लुडो खेळता खेळता जावई विधवा सासूच्या प्रेमात पडला आहे. एवढेच नाही तर हा तरुण तिला गुपचूप भेटायला पोहोचला. मात्र याचा सुगावा गावकऱ्यांना लागला आणि त्यानंतर जे घडले ते अतिशय धक्कादायक आहे. हे संपूर्ण प्रकरण जमुईच्या लक्ष्मीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावाशी संबंधित आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण आपल्या विधवा सासूला भेटण्यासाठी घरी पोहोचला. रात्रीच्या अंधारात भेटायला आलेल्या व्यक्तीला घरचे आणि स्थानिक लोक पकडू शकतील याची त्याला कल्पनाही नव्हती. गावकऱ्यांनी त्याला पकडलं आणि बेदम मारहाण केली. गंभीर जखमी व्यक्तीला नंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. लक्ष्मीपूर पोलिसांनी या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

तरुण कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये लुडो खेळत असे. याच दरम्यान, तो विधवा सासूच्या प्रेमात पडला आणि तिच्यासोबत त्याचे 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. बुधवारी रात्री त्याने सासूला भेटण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मीपूर येथील सासूबाईंच्या गावी पोहोचला. रात्रीच्या अंधारात तो आपल्या सासूला भेटत असतानाच गावकरी व कुटुंबीय तेथे जमा झाले. त्याला ताबडतोब पकडले आणि त्यानंतर अनेक तास मारहाण करण्यात आली. नंतर लक्ष्मीपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या ताब्यात दिले.

तरुणाची गंभीर स्थिती पाहून पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती देताना लक्ष्मीपूर पोलीस स्टेशनचे अध्यक्ष राजवर्धन कुमार यांनी सांगितले की, स्थानिक लोकांनी तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. माहिती घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल. सध्या जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.