शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत 'AI समिट'मध्ये युथ काँग्रेसचे 'शर्टलेस' आंदोलन; ४ कार्यकर्त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 15:54 IST

दिल्लीतील भारत मंडपममध्ये 'एआय समिट' दरम्यान शर्टलेस आंदोलन करणाऱ्या युथ काँग्रेसच्या ४ कार्यकर्त्यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नवी दिल्ली: नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपममध्ये आयोजित 'एआय इम्पॅक्ट समिट' दरम्यान गोंधळ घालणाऱ्या भारतीय युथ काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांना दिल्ली न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत अंगावरील कपडे काढून आंदोलन केल्याने आणि देशविरोधी घोषणाबाजी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

शुक्रवारी भारत मंडपममध्ये जागतिक स्तरावरील एआय समिट सुरू असताना युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अचानक आंदोलनास सुरुवात केली. आंदोलकांनी अंगावरील शर्ट काढून घोषणाबाजी केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले. शनिवारी त्यांना न्यायदंडाधिकारी रवी यांच्यासमोर हजर करण्यात आले.

पोलीस आणि वकिलांचा युक्तिवाददिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, आंदोलकांनी पंतप्रधानांच्या आक्षेपार्ह फोटोंचे टी-शर्ट घातले होते. तसेच नेपाळमधील 'जेन-झेड' आंदोलनाच्या धर्तीवर देशाला विभागणाऱ्या आणि देशविरोधी घोषणा दिल्या. या आंदोलनामुळे काही पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, यामागील कटाचा तपास करण्यासाठी ५ दिवसांची कोठडी आवश्यक आहे.

बचाव पक्षाचा दावाआंदोलकांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, हे केवळ एक शांततापूर्ण लोकशाही आंदोलन होते. देशविरोधी घोषणाबाजी किंवा पोलिसांवर हल्ला केल्याचा कोणताही पुरावा पोलिसांकडे नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Youth Congress' 'Shirtless' Protest at Delhi AI Summit; Custody for Four

Web Summary : Youth Congress activists disrupted Delhi's AI summit with a 'shirtless' protest, chanting anti-national slogans. Four have been remanded to five days police custody following the chaos at Bharat Mandapam. Police claim the protest was pre-planned.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सcongressकाँग्रेस