शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

तुमच्या पाठिंब्यामुळेच विकासाला वेग मिळाला - पंतप्रधान मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 06:04 IST

चार वर्षांपूर्वी भारतात विकास घडवून आणण्यासाठी आम्ही जो प्रवास सुरू केला, त्याला गेल्या चार वर्षांत चळवळीचे रूप प्राप्त झाले असून, या प्रवासात प्रत्येक भारतीयाच्चा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे आमच्या सरकारवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी देशातील जनतेसमोर नतमस्तक होतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी त्यांच्या सरकारला चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त केल्या.

नवी दिल्ली -  चार वर्षांपूर्वी भारतात विकास घडवून आणण्यासाठी आम्ही जो प्रवास सुरू केला, त्याला गेल्या चार वर्षांत चळवळीचे रूप प्राप्त झाले असून, या प्रवासात प्रत्येक भारतीयाच्चा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे आमच्या सरकारवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी देशातील जनतेसमोर नतमस्तक होतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी त्यांच्या सरकारला चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त केल्या.पंतप्रधानांनी देशातील जनतेचे आभार मानतानाच, तुमचा पाठिंबा व प्रेम यांमुळे देशाच्या विकासाचे काम करण्यासाठी आम्हाला ऊ र्जा मिळाली, असे सांगून, यापुढेही आपले सरकार हे काम असेच पुढे सुरू ठेवेल, असा दावाही केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त करतानाच, त्यांच्या सरकारने गेल्या चार वर्षांत केलेल्याविकास कामांची माहिती देणारा एक व्हिडीओही शेअर केला.संध्याकाळी ओडिशातील कटकमध्ये जाहीर सभेत बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेस व एकूणच विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. आमचे सरकार जनतेला बांधिल आहे, आमच्या मनात विकासाच्या प्राधान्याबद्दल अजिबात गोंधळ नाही, असे ते म्हणाले.चांगले प्रशासन हे आमचे ब्रिदवाक्य आहे. काँग्रेसने त्यांच्या कारकीर्दीत जी कामे केली नाहीत, ती आम्ही गेल्या चार वर्षांत करून दाखवली, याचा मला अभिमान आहे. आमचा एकही मुख्यमंत्री भ्रष्टाचाराबद्दल तुरुंगात गेला नाही, भ्रष्टाचार आम्ही कधीच खपवून घेतला नाही आणि यापुढेही सहन करणार नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर जनतेने सातत्याने विश्वास दाखवला आहे. त्यामुळेच इतक्या राज्यांत रालोआची सत्ता आहे, असे सांगून, ते म्हणाले की आम्हीही हा विश्वास सार्थ ठरवूगरिबीचा आम्ही अनुभव घेतलापूर्व व ईशान्येकडील राज्यांकडे काँग्रेसने कायमच दुर्लक्ष केल्याचा आरोप करून मोदी म्हणाले की, गेल्या चार वर्षांपासूनच या राज्यांतील विकासाची फळे मिळू लागली आहेत. यापुढील काळात ती आणखी वेगाने मिळतील, अशी मला खात्री आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती या तिघांनी गरिबी अनुभवली आहे. त्यांना गरिबांचे प्रश्न व दु:ख माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या कल्याणासाठी आम्ही सारे लढत आहोत.पुन्हा आम्हालाच बहुमत : सरकारला चार वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी २0१९ च्या निवडणुकांतही भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल, अशी खात्री व्यक्त केली. ते म्हणाले की, आमचे पंतप्रधान मोदी रोज २१ ते २३ तास काम करतात. असा पंतप्रधान आतापर्यंत भारताला कधीच मिळाला नव्हता.मोदी सरकारवर नापासचा शेराशीलेश शर्मानवी दिल्ली : केंद्रातील सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांचे भाजपा नेते तोंड भरून कौतुक करीत असताना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारच्या प्रगती पुस्तकावर नापास झाल्याचाच शेरा मारला. त्यांना, अ, ब, क, ड यापैकी कोणताही दर्जा देणे शक्य नसून, त्यांना एफ (फेल-नापास) हाच दर्जा देता येईल, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकार सर्वच क्षेत्रांत अपयशी ठरले आहे, असा हल्ला राहुल गांधी यांनी चढवला. राहुल यांनी ट्विटरच्या माध्यमातून जारी केलेले मोदी सरकारवरील रिपोर्ट कार्डमध्ये कृषी, परराष्ट्र धोरण, इंधनाचे दर व रोजगार निर्मितीमध्ये मोदी सरकारला 'एफ' म्हणजेच 'फेल' झाल्याचा शेरा मारला.केवळ घोषणा, जाहिरातबाजीमोदी व त्यांचे सरकार केवळ घोषणाबाजी व जाहिरातबाजीमध्ये आघाडीवरअसल्याचा टोलाही राहुल गांधी यांनी हाणला. महत्त्वाच्या सर्व प्रश्नांवर मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. पण भाषणबाजीने सरकारने लोकांना आकर्षित केले आहे. केवळ संभाषणातच ते चतुर वा अव्वल ठरले आहे, असेही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले.आरोप खोटे असल्याचेसिद्ध करुन दाखवा- सिंघवीकाँग्रेस नेत्यांनी सर्व राज्यांच्या राजधानीच्या शहरात पत्रकार परिषदांद्वारा काँग्रेसवर आकडेवारीनिशी टीका केली. मुंबईत पक्षाचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी आपल्या आकडेवारीला भाजपाने आकडेवारीनेच उत्तर द्यावे, असे आव्हान दिले. आपण दिलेली आकडेवारी खरी असून, ती खोटी असल्याचे भाजपाने सिद्ध करावे, असे ते म्हणाले.काँग्रेसने आज विश्वासघात दिन पाळला. त्या निमित्त काँग्रेसने सरकारने देशाचीकशी फसवणूक केली, हे सांगणारी पुस्तिका प्रकाशित केली. तसेच एक पोस्टरही जारी केली. कार्यकर्त्यांनीविविध भागांत केंद्र व भाजपाच्याविरोधात निदर्शने धरली, धरणे धरलीव काही ठिकाणी मोर्चेही काढले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारIndiaभारत