रस्ते अपघातांमध्ये तरुणांचे सर्वाधिक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 04:02 AM2018-08-10T04:02:40+5:302018-08-10T04:02:48+5:30

रस्ते अपघातात मरण पावलेल्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक मोठी आहे.

The youngest victim of road accident | रस्ते अपघातांमध्ये तरुणांचे सर्वाधिक बळी

रस्ते अपघातांमध्ये तरुणांचे सर्वाधिक बळी

Next

नवी दिल्ली : रस्ते अपघातात मरण पावलेल्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक मोठी आहे. बळींपैकी ६५ टक्के लोक हे १८ ते ३५ वर्षे वयोगटातील आहेत, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत दिली.
देशातील राष्ट्रीय महामार्गांवर ७८६ ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण मोठे आहे. यापैकी काही ठिकाणी प्रत्येकी ५०हून अधिक अपघात झालेले आहेत. या ठिकाणांची यादी तयार करून तिथे रस्तेदुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.
पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले, मद्यपान करून तसेच मोबाइलवर बोलत गाडी चालविणे लोकांनी टाळायला हवे. रस्ते अपघातात मरण पावलेल्यांमध्ये तरुणांची संख्या अधिक आहे. मोटरवाहन विधेयक राज्यसभेमध्ये मंजूर करण्यासाठी यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही गडकरी यांनी केले.

Web Title: The youngest victim of road accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.