शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘स्टार्टअप महाकुंभ’ : तरुणच देत आहेत नोकऱ्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 07:35 IST

ही नवीन संस्कृती विकसित भारतच नव्हे तर जगाच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.

नवी दिल्ली : भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप्सचा बाजार आहे. देशातील तरुण याचे नेतृत्व करीत आहेत. स्टार्टअपचे नेतृत्व ४५ टक्क्यांपेक्षा अधिक महिला करीत आहेत. देशातील तरुण आता नोकरी मागण्याऐवजी नोकरी देणारा बनला आहे.

ही नवीन संस्कृती विकसित भारतच नव्हे तर जगाच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. भारत मंडपममध्ये आयोजित ‘स्टार्टअप महाकुंभ’मध्ये ते बोलत होते. 

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, एआय, सेमिकंडक्टर आणि क्वांटम यासाठी सुरू केलेले तीन मिशन तरुणांना मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची संधी देणार आहेत. 

जगभरातील गुंतवणूकदारांना यामुळे गुंतवणुकीची संधी उपलब्ध होणार आहे. भारतातील स्टार्टअप इकोसिस्टीम केवळ मोठ्या मेट्रो शहरांमध्ये नाही तर स्टार्टअप क्रांतीचे नेतृत्व लहान शहरांमधील तरुण करीत आहेत. 

भारतासाठी ही मोठी संधी एआयमध्ये भारताचे पारडे जड आहे, हे जगाने मान्य केले आहे. ही संधी गमावू नये यासाठी एआयला प्राधान्य द्यावेच लागणार आहे. मला विश्वास आहे की, भारतीय तरुणांच्या संकल्पना अनेक देशांच्या समस्या सोडवू शकतील, असेही पंतप्रधान म्हणाले. 

२००० स्टार्टअप्स, १० देशांचे ३००० प्रतिनिधी भारत मंडपममध्ये भरलेला ‘स्टार्टअप महाकुंभ’ हा देशातील आजवरचा सर्वात मोठा व अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. देशभरातील २०००हून अधिक स्टार्टअप, १००० पेक्षा अधिक गुंतवणूकदार, १०० हून अधिक यूनिकॉर्न व ३०० पेक्षा अधिक इनक्युबेटर्स सामील झाले आहेत. दहापेक्षा अधिक देशांच्या ३००० हजारांहून अधिक प्रतिनिधींना यात सहभाग घेतला आहे. ५० हजारपेक्षा अधिक व्यावसायिकांना याला भेट दिली आहे. कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक (नाबार्ड), स्मॉल इंडस्ट्रीड डेव्हलपमेंट बँक (सिडबी), एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (इसीजीसी) यांच्या पुढाकारातून याचे आयोजन केले आहे. 

देशात १.२५ लाख स्टार्टअप्स २०१४ मध्ये देशात १०० स्टार्टअप्सही नव्हते. आज ही संख्या १.२५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. जवळपास १२ लाख तरुण स्टार्टअप्सशी थेट जोडले गेलेले आहेत. आमच्याकडे ११० पेक्षा अधिक यूनिकॉर्न आहेत, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. 

मी सुद्धा घेताे एआयची मदतमी स्वत: एआयची खूप मदत घेतो. निवडणूक प्रचारात प्रादेशिक भाषांमुळे अनेकदा अडचण येते. अशावेळी मी एआयच्या मदतीने माझे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचवतो.     - नरेंद्र माेदी, पंतप्रधान

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी