शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
अब्जाधीश असूनही पान मसाल्याचं प्रमोशन? यूट्यूबर ध्रुव राठीचे शाहरुख खानला गंभीर प्रश्न; पैशांचा हिशोब सांगितला
3
मोठी गंमत! उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन; गेल्यावर्षीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली...  
4
त्वचारोग तज्त्र डॉक्टर पत्नीला कायमचं संपवलं; इंजेक्शन देऊन पतीनेच केले खतरनाक कृत्य
5
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
6
भारताची रशियाकडून मोठी खरेदी; स्वस्त तेल खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर, मग पहिलं कोण?
7
शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; Nifty २५,४०० च्या वर, खासगी बँकांच्या शेअर्समध्ये खरेदी
8
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
9
BSNLची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ १ रुपयांत महिनाभर चालेल इंटरनेट; सोबतच मिळणार अनलिमिटेड कॉलिंगही, पाहा
10
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
11
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
12
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
13
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
14
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
15
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
16
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
17
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
18
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
19
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
20
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा

VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 14:10 IST

पहलगाममध्ये दहशतवाद्यांना मदती केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतलेल्या तरुणाचा मृतदेह सापडल्याने काश्मीरमध्ये खळबळ उडाली आहे.

Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांकडून काश्मीरमध्ये जोरदार मोहिम राबवण्यात येत आहे. अशातच नदीच्या किनारी एका काश्मिरी तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याने त्याच्या मृत्यूनंतर आता सुरक्षा दलांवर आरोप करण्यात आले आहेत. मृतदेह सापडल्यानंतर तरुणाचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये तो तरुण सुरक्षा दलांपासून पळून जाताना दिसत आहे. तरुणाने नदीत उडी मारल्याने तो वाहून गेला आणि त्याचा मृत्यू झाला. या तरुणावर दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आणि मदत करण्याचा आरोप होता. त्यामुळे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. सध्या या प्रकरणात न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

रविवारी सकाळी काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अहरबल भागातील अदबल नाल्यातून इम्तियाज अहमद या २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला. सुरक्षा दलांच्या ताब्यात असताना त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप इम्तियाजच्या कुटुंबीयांनी केला. इम्तियाजला काही दिवसांपूर्वी सैन्याने ताब्यात घेतले होते. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दुसरीकडे, इम्तियाज अहमदने स्वतः नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओमध्ये इम्तियाज नदीत उडी मारताना दिसत आहे. इम्तियाजवर दहशतवाद्यांना जेवण पुरवल्याचा आणि त्यांची राहण्याची व्यवस्था केल्याचा आरोप होता.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, इम्तियाजला दहशतवाद्यांचा ओव्हरग्राउंड वर्कर असल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. सुरक्षा दलांना दहशतवाद्यांच्या अड्ड्याकडे नेत असताना इम्तियाजने वैष्णो नदीत उडी मारली आणि त्याचा मृत्यू झाला. इम्तियाजचा मृतदेह सापडल्यानंतर काही तासांनी ड्रोन फुटेज समोर आले, ज्यामध्ये एक तरुण अडबाल नाल्यात उडी मारताना दिसत आहे. त्याने दहशतवाद्यांना मदत केल्याची कबुली दिली होती. त्यावेळी तो जंगलातील एका लपण्याच्या ठिकाणी सुरक्षा दलांना घेऊन जात होता. मात्र त्याने पळ काढला आणि नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला.

माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी एक्स पोस्टवरुन याबाबत भाष्य केलं. "कुलगाममधील नाल्यातून आणखी एक मृतदेह सापडला आहे, ज्याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की सुरक्षा दलांनी इम्तियाजला दोन दिवसांपूर्वी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते आणि आता त्याचा मृतदेह  नाल्यात सापडला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा काश्मीरमधील शांतता बिघडवण्याचा, पर्यटन विस्कळीत करण्याचा आणि देशभरातील सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होता," असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानMehbooba Muftiमहेबूबा मुफ्ती