शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीला फोटोवरून ट्रोल केले, शशी थरूर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 06:57 IST

Shashi Tharoor : एका  तरुणीला ट्विटरवर काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्यासोबतचा फोटो शेअर केल्यामुळे प्रचंड ट्रोल करण्यात आले. भाषेची मर्यादा विसरून ट्रोलर्सनी फोटोवर इतक्या वाईट कमेंट केल्या की, एक पोस्ट लिहून अखेर तिने फोटो डिलीट केला.

एका  तरुणीला ट्विटरवर काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्यासोबतचा फोटो शेअर केल्यामुळे प्रचंड ट्रोल करण्यात आले. भाषेची मर्यादा विसरून ट्रोलर्सनी फोटोवर इतक्या वाईट कमेंट केल्या की, एक पोस्ट लिहून अखेर तिने फोटो डिलीट केला. ‘शशी थरूर सरांसोबतच्या माझ्या फोटोचा उजव्या विचारसरणीचे लोक कसा गैरवापर करत आहेत हे पाहून वाईट वाटते. हे लोक राजकीय फायद्यासाठी चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत. मला निमंत्रित केलेल्या एका साहित्य संमेलनात गेली होती. त्यावेळी इतरांप्रमाणे मीदेखील महान लेखकासोबत फोटो क्लिक केले. परंतु लोकांनी फोटोवर घाणेरड्या कथा बनवण्यास सुरुवात केली आहे. मी सर्व फोटो डिलीट केलेत, कृपया ज्यांनी फोटो वापरलाय त्यांनीही तो डिलीट करावा अशी विनंती करते’, असे तिने म्हटले. त्यावर शशी थरूर यांनीही रिप्लाय दिला आणि ट्रोलर्सना चांगलेच फटकारले. ‘तुम्ही एका खऱ्याखुऱ्या व्यक्तीसोबत गैरवर्तन करताय हे ट्रोलर्सना समजायला हवे, एका फोटोसाठी या तरुण मुलीला इतके सहन करावे लागतेय... त्या कार्यक्रमात मी ५० पेक्षा जास्त लोकांसह फोटो काढले असतील... तुमची आजारी मानसिकता तुमच्याकडेच ठेवा’, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. त्यांचे उत्तर नेटकऱ्यांच्या पसंतीस पडले असून त्याखाली सोशल मीडियावर लोक इतके निर्दयी कसे होतात यावरून अनेक जण चर्चा करत आहेत.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरSocial Mediaसोशल मीडिया