शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

"तरुण आत्महत्या करतोय", Facebook च्या आयर्लंडच्या ऑफिसमधून थेट दिल्लीत फोन, तरुणाचा जीव वाचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 09:58 IST

देशाची राजधानी दिल्लीमध्ये पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका तरुणाचा जीव वाचला आहे आणि यात फेसबुकचंही मोलाचं योगदान मिळालं आहे.

नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीमध्ये पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका तरुणाचा जीव वाचला आहे आणि यात फेसबुकचंही मोलाचं योगदान मिळालं आहे. संबंधित तरण सिग्नेचर ब्रिजजवळ आत्महत्या करण्यासाठी जात होता. त्याचवेळी फेसबुक ऑफिसमधून दिल्ली पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन आला आणि तरुण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे असं सांगण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी तत्परतेनं तरुणाला आत्महत्या करण्यापासून रोखलं आहे. 

जगभरात १० सप्टेंबर रोजी जागतिक आत्महत्या दिन म्हणून साजरा केला जातो. दिल्ली पोलीस सायबर सेलचे डीसीपी अनयेश राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलला अचानक आयर्लंडमधील फेसबुकच्या कार्यालयातून फोन आला. दिल्लीत एक तरुण आत्महत्या करायला जातोय. त्याच्या फेसबुक प्रोफाइलवरुन तशी अॅक्टीव्हीटी समोर आली आहे.

फेसबुकचा फोन पोलिसांनी गांभीर्यानं घेत संबंधित तरुणाचे लोकेशन ट्रेस केले तर तो सिग्नेचर ब्रिजजवळ असल्याचं आढळून आलं. तरुणाचे लोकेशनचा पत्ता लागल्यानंतर पोलिसांना तात्काळ संबंधित वायरलेस पोलिसांच्या कानावर माहिती टाकली आणि अलर्ट करण्यात आलं. पोलिसांनी यासाठी संबधित तरुणाच्या भावाचीही मदत घेतली आणि त्याला फोन करायला सांगून बोलण्यात व्यग्र ठेवलं. त्यानंतर पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले आणि आत्महत्या करण्यापासून रोखलं. अशापद्धतीनं फेसबुक आणि पोलिसांमुळे एका तरुणाचा जीव वाचू शकला. तरुणाचं तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्यात आलं आणि कुटुंबीयांकडे सोपविण्यात आलं आहे. 

टॅग्स :Facebookफेसबुकdelhiदिल्ली