शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

'तुम्ही एक दिवस संसदेचेही खासगीकरण कराल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 06:39 IST

संजय राऊत यांचा केंद्र सरकारला टोला; कामगार संघटनांचा ८ जानेवारीला देशव्यापी संप

मुंबई : तेल कंपन्या, रेल्वे यांचे खासगीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न असून, तुम्ही एक दिवस लष्कर, पोलीस आणि संसदेचेही खासगीकरण कराल, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला. शुक्रवारी ते कामगार संघटना कृती समितीच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांनी देशव्यापी संप ८ जानेवारी रोजी पुकारला आहे. कामगारांच्या देशव्यापी संपाला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आदी राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, केंद्र सरकारने चांगले उद्योग विकायला काढले. तेल कंपन्या, बीपीसीएल, सरकारी जमिनी, रेल्वे, विमान कंपन्या विकत आहेत. या उद्योगांमुळे लाखो कामगारांच्या घरची चूल पेटते, पण सर्व सरकारी उद्योग बंद करून चार लोकांच्या हातात देत आहात. उद्या संसदेचे, पोलीस खात्यांचे आणि भारतीय सैन्याचे खासगीकरण कराल, असा टोलाही राऊत यांनी लगावला.महाराष्ट्रात शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आहे. येथील कामगार संघटनांचा या सरकारला पाठिंबा आहे. सेनेने कामगारांच्या प्रश्नांवर आपसात संघर्ष केला नाही. त्यामुळे जानेवारीत होणाऱ्या देशव्यापी संपात शिवसेना सहभागी होणार आहे. जेव्हा मुंबई बंद होते, तेव्हा त्याचे देशावर परिणाम होतात, हे कोणीही विसरू नये, असा इशारा राऊत यांनी मोदी सरकारला दिला आहे.केंद्र सरकार २ कोटी नोकºया देणार होते, परंतु देशातल्या ५ कोटी नोकऱ्या गेल्या आहेत. रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत करण्याच्या घोषणा केल्या होत्या. याउलट घोषणा करणाऱ्यांनी रिझर्व्ह बँकेतून १ लाख ७६ हजार कोटी ओरबाडले, असे ते म्हणाले. संपात केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी संघटना, बँक, विमा, पोर्ट ट्रस्ट, बीपीसीएल, एचपीसीएल, बीएसएनएल, एमटीएनएल, टॅक्सी, रिक्षा, एसटी, बेस्ट, मालवाहतूकदार, अंगणवाडी, आशा वर्कर्स, घरकामगार, माथाडी कामगार, पालिका कामगार आदी क्षेत्रांतील, आस्थापनांतील कामगार सहभागी होणार आहेत.अशा आहेत काही प्रमुख मागण्याकिमान वेतन २१,००० व्हावे, असंघटित कामगार, शेतकरी, कष्टकरी सर्वांना किमान पेन्शन १०,००० रुपये करा, प्रभावी रोजगार हमी कायदा करा, मनरेगावर कामगारांना अधिक दिवस व वाढीव दराने रोजगार पुरवा, ग्रामीण भागात सरकारने अधिक गुंतवणूक करावी, स्वामिनाथन समितीच्या शिफारशी अंमलात आणाव्यात, कायमस्वरूपी रोजगार निर्माण करावेत, योजनांवरील कामगारांना कायम करा, कंत्राटी कामगार कायदा रद्द करून सर्वांना कायम करा, समान काम, समान वेतन इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSanjay Rautसंजय राऊत