शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही तोडगा काढा, अन्यथा आम्ही..."; सर्वोच्च न्यायालय राज्यपाल आणि तामिळनाडू सरकारवर का भडकले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 15:32 IST

तामिळनाडूतील द्रमुक सरकार आणि राज्यपाल यांच्यातील वादावर सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. 

तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवि आणि मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सरकारमध्ये सातत्याने सुस्त संघर्ष सुरू आहे. राज्यपाल रवि यांच्याकडून निर्णयांना मंजुरी दिली जात नसल्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल आणि राज्य सरकारला इशारा दिला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.बी. पारदीवाला यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. तामिळनाडूतील काही विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीवरून आणि काही विधेयक मंजूर करण्यावरुन राज्य सरकार आणि राज्यपाल आमने-सामने आल्याचे चित्र आहे. 

राज्यपालांनी नियुक्ती केली होती समिती

गेल्या वर्षी राज्यपाल आर. एन. रवि यांनी मद्रास विद्यापाठी, भारथिअर विद्यापीठ आणि तामिळनाडू शिक्षण प्रशिक्षण विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी एक समिती स्थापन केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सरकारने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. 

राज्यपाल कुलपती असले तरी अशा पद्धतीने समिती गठीत करणे कायद्याला धरून नाही, असे तामिळनाडू सरकारचे म्हणणे आहे. रवि यांनी केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती गठीत केली होती. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर रवि यांनी समिती नियुक्तीचा निर्णय मागे घेतला. 

राज्यपालांनी विधेयक रखडवली

राज्य सरकारकडून मंजुरीसाठी पाठवण्यात आलेले विधेयकाला राज्यपालांकडून वर्ष झाले तरी मंजुरी देण्यात न आल्याच्या मुद्द्यावर राज्य सरकारने कोर्टात जोर दिला. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की पुढील सुनावणीपर्यंत आपसात तोडगा काढा अन्यथा आम्ही निर्णय घेऊ", असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला. 

कोणत्या विधेयकावरून वाद

विद्यापीठाच्या कुलगुरू नियुक्तीसंदर्भात विद्यापीठाचे कुलपती म्हणून राज्यपालांना असलेले अधिकार मर्यादित करण्यासंदर्भात तामिळनाडू सरकारने विधेयक मंजूर केले आहे. हे विधेयक राज्यपालांकडे पाठवण्यात आलेले आहे, मात्र राज्यपालांकडून त्याला मंजुरीच देण्यात आलेली नाही. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूSupreme Courtसर्वोच्च न्यायालयState Governmentराज्य सरकारuniversityविद्यापीठ