शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

आता टेस्ट न देताच मिळू शकेल ड्रायव्हिंग लायसन्स; जाणून घ्या प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 06:07 IST

केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा निर्णय; ट्रेनिंग सेंटर सुरू करणार

नवी दिल्ली : ड्रायव्हिंग टेस्ट न देताच ड्रायव्हिंग लायसन्स देण्यासाठी विशेष व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय केंद्रीय परिवहन मंत्रालयाने घेतला आहे. त्यासाठी देशभरात ‘ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्स’ सुरू करण्यात येणार असून, या सेंटर्समध्ये प्रशिक्षण घेतलेल्या लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी आरटीओ कार्यालयात जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज भासणार नाही.रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ‘ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर’ स्थापन करण्यासाठी एक मसुदा अधिसूचना जारी केली आहे. या सेंटरवर प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तीला टेस्ट न देताच ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकेल. या केंद्रांद्वारे विशेष प्रशिक्षण दिलेले चालक निर्माण केले जातील. त्यातून अधिक कार्यक्षमता तयार होईल आणि रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होईल. मंत्रालयाने जारी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्समधून यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करताना ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज भासणार नाही. ट्रेनिंग सेंटरच्या प्रमाणपत्राधारे त्याला लायसन्स दिले जाईल. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत रस्ते सुरक्षा महिना साजरा करत आहे. अपघात अर्ध्यावर आणण्याचे उद्दिष्ट २०२५ पर्यंत रस्ते अपघात अर्ध्यावर आणण्याचे उद्दिष्ट रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ठेवले आहे. रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय रस्ते सुरक्षा परिषदेच्या बैठकीत यावर विशेष भर दिला होता. गडकरी यांनी म्हटले की, अपघात कमी करणे हे काही टप्प्याटप्प्याने गाठायचे उद्दिष्ट नव्हे. हे काम सर्वोच्च प्राधान्य देऊन ते तात्काळ प्रभावाने व्हायला हवे. रस्ते सुरक्षा उपायांबाबत जाणीव जागृती करण्यासाठी, तसेच लोकांना याबाबत शिक्षण देण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करण्याची सूचना गडकरी यांनी केली आहे.