शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कुणाच्या घरात घुसून आंदोलन कसे काय करू शकता? हायकोर्टाचा 'आप'ला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 04:04 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नायब राज्यपालांच्या कार्यालयात सुरू केलेल्या आंदोलनाबाबत हायकोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

नवी दिल्ली : दुसऱ्याच्या घरात त्याच्या परवानगीशिवाय शिरून तेथे धरणे धरण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा मार्मिक सवाल दिल्ली उच्च न्यायालयाने केल्याने गेला आठवडाभर दिल्लीच्या राजनिवासात ठिय्या देऊन बसलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व अन्य तीन मंत्र्यांची मोठी पंचाईत झाली.दिल्लीच्या अधिकारीवर्गाने पुकारलेला अघोषित संप मागे घेण्याचा आदेश नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी द्यावा या मागणीसाठी मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया व गोपाल राय आणि सत्येंद्र राय हे दोन मंत्री ११ जूनपासून राजनिवासाच्या आगांतूक कक्षात धरणे धरून बसले आहेत. दोन या धरण्याच्या विरोधात तर एक अधिकाºयांच्या संपाच्या विरोधात अशा तीन याचिका उच्च न्यायालयात करण्यात आल्या आहेत.न्या. ए. के. चावला व न्या. नविन चावला यांच्या खंडपीठापुढे या याचिका सुनावणीसाठी सुनावमीसाठी आल्या तेव्हा दिल्ली सरकारच्या वकिलाने मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांची मागणी कशी योग्य आहे, हे सांगण्यास सुरुवात केली. मंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकांना अधिकारी जात नाहीत, अशी कबुली देऊन आयएएस संघटनेने अधिकारी ‘अघोषित’ संपावर आहेत, यास दुजोराच दिला आहे, असे त्यांचे म्हणणे होते.यावर न्यायमूर्तींनी सरकारच्या वकिलावर प्रश्नांची सरबत्ती केली. न्यायमूर्तींनी त्यांना विचारले, तुम्ही (मंत्री) संपावर नाहीत, तर धरणे धरून बसले आहेत, असे तुमचे म्हणणे आहे. असे धरणे धरायला तुम्हाला कोणी परवानगी दिली. हा प्रत्येक मंत्र्याचा व्यक्तिगत निर्णय आहे, असे वकिलाने सांगितल्यावर न्यायालय म्हणाले, तुम्ही राजनिवासाच्या दारावर किंवा बाहेर नव्हे तर आत ठाण मांडले आहे. तेथे अशा प्रकारे धरणे धरायला तुम्हाला परवानगी कोणी दिली? दुस-याच्या घरात त्याच्या परानगीशिवाय शिरायचे आणि तेथे अहोरात्र बसून राहायचे याला संप किंवा धरणे म्हणत नाहीत. अशा गोष्टी करण्याच्या जागा वेगळ्या आहेत!हे धरणे बंद करण्याचा केजरीवाल यांना आदेश द्यावा, यासाठी भाजपा आमदार विजेंद्र गुप्ता यांनी केलेली नवी याचिकाही खंडपीठाने दाखल करून घेतली. आयएएस संघटनेसही प्रतिवादी करण्यास सांगून पुढील सुनावणी शुक्रवारी ठेवली गेली.

अधिकारी चर्चेस तयारअधिकाऱ्यांना त्यांच्या सुरक्षेची काळजी वाटत असेल तर त्याची हमी मी देतो. त्यांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा जपणे हे माझे कर्तव्यच आहे, या मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या वक्तव्याचे दिल्ली प्रशासनातील अधिकारीवर्गाने स्वागत केले आहे. मुख्यमंत्री ठोस हस्तक्षेप करणार असतील तर आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायला आवडेल, असे दिल्ली कॅडरच्या अधिकारी संघटनेने म्हटले. मात्र आम्ही संपावर नाही. पूर्ण उत्साहाने व समर्पणाने आम्ही काम करीत आहोत, असे संघटनेने ट्विट केले.>दिल्लीकर पोळताहेतदिल्लीचे मुख्यमंत्री नायब राज्यपालांच्या निवासस्थानी धरणे धरून बसलेत. भाजपावाल्यांनीे मुख्यमंत्र्यांच्या घरी धरणे धरलेय. दिल्लीचे अधिकारी पत्रकार परिषद घेताहेत. या सर्व अनागोंदीकडे पंतप्रधान काणाडोळा करताहेत एवढेच नव्हे तर त्याला प्रोत्साहन देताहेत. या सर्व नाटकाने दिल्लीचे नागरिक मात्र भरडले जाताहेत.-राहुल गांधी, अध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालCourtन्यायालयdelhiदिल्ली