शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

200, 2000 रुपयांच्या खराब नोटा असतील तर व्हा सावध !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 10:55 IST

200, 2000 रुपयांच्या खराब, फाटलेल्या नोटा असतील तर वेळीच सावध व्हा....

मुंबई - नोटांबदी लागू झाल्यानंतर RBIकडून 200 रुपये व 2000 रुपयांच्या नवीन नोटा चलनात येऊन दीड वर्ष झाली. पण व्यवहारात आलेल्या या नवीन नोटांबाबतच्या समस्या वाढताहेत. कारण, तुमच्याजवळ  असलेल्या 200 किंवा 2000 रुपयांच्या नोटा कोणत्याही कारणामुळे जर खराब झाल्या असतील किंवा फाटल्या असतील तर त्या नोटा बदलून मिळणार नाहीत. शिवाय, बँकांमध्ये जमादेखील करता येणार नाहीयेत.  

कारण, चलनातील नोटांच्या देवाणघेवाणांसंबधीच्या नियमावलीत या नवीन नोटांचा समावेशच करण्यात आलेला नाही. यामुळे फाटलेल्या, खराब अवस्थेत असलेल्या 200 व 2000 रुपयांचा नोटा तुमच्याकडे असतील तर वेळीच सावध व्हा. फाटलेल्या- खराब झालेल्या नोटा बदलणं ( नोट एक्सचेंज), जमा करण्याचा प्रकार आरबीआय नियमांतर्गंत येतो. हा नियम आरबीआय कायद्याच्या कलम 28 चा एक भाग आहे. या कायद्यामध्ये 5, 10, 50, 100, 500 रुपयांच्या नोटांचा उल्लेख करण्यात आला आहे, मात्र 200 आणि 2000 रुपयांच्या नोटांचा यात उल्लेखच नाही. याचे कारण म्हणजे सरकार आणि आरबीआयनं या नोटांच्या आदान-प्रदान लागू असलेल्या नियमांमध्ये बदल केलेले नाहीत. यामुळे 200 किंवा 2000 नोटा फाटल्या असतील किंवा खराब झाल्या असतील तर त्या बँकांमध्ये जमा करता येणार नाहीयेत शिवाय बदलतादेखील येणार नाहीयेत.

8 नोव्हेंबर 2016मध्ये नोटाबंदी नियम लागू झाल्यानंतर 2,000 रुपयांची नवीन नोट चलनात आणण्यात आली यानंतर 200 रुपयांची नोट ऑगस्ट 2017मध्ये वापरात आली. आरबीआयनं आता 2,000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली आहे. 

बँकर्संकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नवीन सीरिजमध्ये फाटलेल्या-खराब झालेल्या नोटांचं प्रमाण कमी आहे. मात्र आरबीआयच्या नियमांमध्ये बदल केले गेले नाहीत तर अडचणी वाढण्याची शक्यता आहे, असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला आहे. 

टॅग्स :Note BanनोटाबंदीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक