शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

लहानग्यांच्या मृत्यूस योगी सरकार जबाबदार,आदित्यनाथांनी तात्काळ राजीनामा द्यावा: गुलाम नबी आझाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2017 17:25 IST

गोरखपूरच्या बी.आर.डी रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा न झाल्यानं लहान मुलांच्या मृत्यूंमुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा देण्याची मागणी जोर धरत आहे.

औरंगाबाद, दि. 13 - गोरखपूरच्या बी.आर.डी रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा न झाल्यानं लहान मुलांच्या मृत्यूंमुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा देण्याची मागणी जोर धरत आहे. गोरखपूर येथे ऑक्सिजनअभावी मुलांच्या मृत्युस योगी आदित्यनाथ सरकार जबाबदार आहे. त्यामुळे  योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ राजीनामा दिला  पाहिजे, अशी मागणी राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद  यांनी केली आहे. ते इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष शुभारंभ सोहळ्याच्या उद्घाटनासाठी औरंगाबादेत आले होते. गोरखपूर हा आदित्यनाथ यांचा मतदारसंघ आहे. पण मी केंद्रीय आरोग्य मंत्री असताना १७ वेळा गोरखपूरच्या त्या हॉस्पिटलला भेट दिलेली आहे. खराब पाण्यामुळे मृत्युचे प्रमाण खूपच वाढलेले होते. पण आम्ही अनेक उपाययोजना करुन मृत्युदर नियंत्रणात आणला. परंतु आता ऑक्सिजन न मिळाल्याने बालकांचे मृत्यू झाले आहेत. हा हॉस्पिटल प्रशासनाच्या  निष्काळजीपणाचा कळस होय. योगी सरकार याला जवाबदार आहे. म्हणून योगी आदत्यिनाथ यांनी नैतिकता स्वीकारुन राजीनामा दिला पाहिजे, असं आझाद म्हणाले. केंद्र सरकार जमिनीवर नाही. त्यांचा कारभार हवेवर चालू आहे. टेलिव्हिजनच्या माध्यमातून  चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून येताना दिलेली सारी आश्वासने विसरुन गेलेले आहेत. आणि केवळ स्वत:चा एक अजेंडा राबवण्यात ते मश्गुल आहेत. त्यांच्यामुळे संघ परिवार सोडता सारेच घटक असुरक्षित असल्याचा आरोप आझाद यांनी पत्रपरिषदेत केला. शरद पवार युपीएबरोबरचनुकतीच दिल्लीत केंद्र सरकारविरोधी रणनिती आखण्यासाठी युपीएची बैठक झाली. त्याला युपीएचे सारे घटक पक्ष उपस्थित होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे उपस्थित नव्हते, त्यावरुन विविध तर्कवितर्क लढवले जात होते. याकडे लक्ष वेधता गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, मी शरद पवारांना त्यादिवशी फोनने संपर्क साधला होता. परंतु त्यांनी प्रकृती बरी नव्हती. त्यामुळेच ते येऊ शकले नाहीत. पण ते युपीएबरोबरच आहेत.६५ देशांना भेटी देण्याचे विसरले नाहीतगुलाम नबी आझाद यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टिका केली. निवनू येण्यापूर्वी दहा कोटी युवकांंना नोकºया देण्याचे आश्वासन ते विसरले, शेतक-यांच्या शेतीमलाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा देण्याचे ते विसरले. आज शेतकरी रोज आत्महत्त्या करीत आहेत. त्याकडे त्यांचे लक्ष नाही. पण पाच वेळा अमेरिकेला भेट देण्याचे आणि एकूण ६५ देशांना भेटी देण्याचे ते बरे विसरले नाहीत, असा उपहास आझाद यांनी केला.जयराम रमेश यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे, याकडे लक्ष वेधता  आझाद म्हणाले, आमच्या पक्षात लोकशाही आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. योग्य मतांचा पक्षात आदर केला जातो. गोरक्षेच्या मुद्यावरुन सध्या देशात उद्भवलेल्या परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले, हिंदू बांधवांना हे मान्य नाही. अनेक हिंदू बांधवांनी या घटनांचा निषेध नोंदवला आहे, जीएसटीमुळे देशातील अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.एक नवी लोकशाही.....नरेंद्र मोदी यांच्या घणाघात घालताना गुलाम  नबी आझाद यांनी सांगितले की, एक नवी लोकशाही ते रुढ करीत आहेत. दिलेली आश्वासने पाळायची नाहीत. स्वत:चाच अजेंडा वापरायचा हा त्यांचा खाक्या दिसूनत येतो. आज देशात मिडियासुध्दा सुरक्षित नाही. महिला, अल्पसंख्यक, दलित, युवक, शेतकरी कुणीही सुरक्षित नाही. फक्त नरेंद्र मोदी आणि संघ परिवार तेवढा सुरक्षित दिसतो.ही ती नवी लोकशाही होय.पत्रपरिषदेस, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधान परिषदेतील उपसभापती माणिकराव ठाकरे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष नामदेवराव पवार, आ. सुभाष झांबड, एम.एम. शेख, डॉ, कल्याण काळे, अरुण मुगदिया आदीची उपस्थिती होती.