शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

योगी आदित्यनाथ तोडणार नोएडातील अंधविश्वास , खुर्ची जाण्याच्या भीतीने अनेकांनी जाणे टाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 02:04 IST

नोएडा भागात भेट देणाºया मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाते असा अंधविश्वास येथील राजकारणात अनेक वर्षांपासून आहे. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा अंधविश्वास बाजूला सारून नोएडा येथे एका कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याचे ठरवले आहे.

लखनऊ : नोएडा भागात भेट देणाºया मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाते असा अंधविश्वास येथील राजकारणात अनेक वर्षांपासून आहे. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा अंधविश्वास बाजूला सारून नोएडा येथे एका कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याचे ठरवले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २५ डिसेंबर रोजी नव्या मेट्रो लाइनचे उद्घाटन होणार असून, या वेळी योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत. भाजपाचे प्रवक्ते चंद्रमोहन यांनी सांगितले की, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त २५ रोजी या मेट्रो लाइनचे उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी योगी आदित्यनाथ हे २३ रोजी नॉयडाला भेट देणार आहेत.ते म्हणाले की, मुख्यमंत्री आदित्यनाथ जनतेच्या हिताच्या कामांना प्राधान्य देतात. ते अंधविश्वासाला थारा देत नाहीत. यापूर्वी अनेक मुख्यमंत्र्यांनी नॉयडाला जाण्याचे टाळले होते. अखिलेश यादव २०१३मध्ये नॉयडात झालेल्या आशियाई विकास बँकेच्या शिखर संमेलनास उपस्थित राहिले नव्हते.तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे या कार्यक्रमास प्रमुख अतिथी होते. अखिलेश यादव यांनी सहा पदरी यमुना एक्स्प्रेस-वेसह अन्य विकासकामांचे उद्घाटन लखनऊतून व्हिडीओ कॉन्फरन्सने केले होते.नोएडा (न्यू ओखला इंडस्ट्रीअल डेव्हलपमेंट एरिया) हा भाग उत्तर प्रदेशात असला तरी तो लखनऊपेक्षा दिल्लीच्या अधिक जवळ आहे. तो आता दिल्लीचा भागच मानला जातो.हे तिघेही गेले नाहीत-राजनाथ सिंह व मुलायम सिंह यादव हेही नॉयडात जाण्यास टाळाटाळ करत होते.माजी मुख्यमंत्री वीर बहादूर हे जून १९९८मध्ये नॉयडाला गेल्यानंतर त्यांची खुर्ची गेली होती.मायावती एकदा तिथे गेल्या. त्यानंतर त्या नॉयडात २०१२ची निवडणूक हरल्या. त्यामुळे हा अंधविश्वास पुन्हा वाढला.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश