शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

Yogi Adityanath: योगींची मोठी घोषणा, प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 13:03 IST

युपीचे अर्थमंत्री विनोद खन्ना यांनी दोन दिवसांपूर्वी 6 लाख 15 हजार 518 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प जाहीर केला आहे. यामध्ये निराधार महिला, वृद्ध, निवडक विद्यार्थी यांना पेन्शन- स्कॉलरशीप जाहीर केली आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघासह आपल्या मतदारसंघासाठीही मेट्रोची घोषणा केली आहे. आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये योगींनी आश्वासनांच्या पूर्ततेकडे वेगाने आगेकूच केल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे राज्यातील युवकांच्या नोकरीसंदर्भातही त्यांनी मोठी घोषणा केली आहे. 

युपीचे अर्थमंत्री विनोद खन्ना यांनी दोन दिवसांपूर्वी 6 लाख 15 हजार 518 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये वृद्धांना १००० रुपये पेन्शन, शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 5 लाखांची नुकसान भरपाई, विधवा महिलांना 1 रुपये पेन्शन आदी घोषणा केल्या आहेत. त्यानंतर, विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांनी रोजगारासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना सरकारचा प्लॅनच सांगून टाकला.  युवकांसाठी सरकार सज्ज आहे, त्यांच्या रोजगारासाठी सरकारने काही योजना तयार केल्या आहेत. सरकारकडून रोजगार कार्ड जारी करण्यात येणार आहे. त्यानुसार, प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला रोजगार देण्यात येईल. आम्ही पोलीस खात्यात 5 लाख नोकऱ्या दिल्या, पण एकही प्रश्न विचारण्यात आला नाही. योग्येतनुसार उमेदवारांची तेथे निवड झाली आहे. राज्यात 1 कोटी 61 लाख युवकांना रोजगार देण्यात येणार असून 60 लाख स्वयंरोजगाराचीही योजना असल्याचं योगींनी विधानसभेत सांगितलं. 

4 लाख रोजगार निर्मित्तीचे उद्दिष्ट

अनाथ मुलांना सहावी ते 12 वी पर्यंत मोफत शिक्षणासाठी 300 कोटी रुपये देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेसाठी 600 कोटी रुपये देण्यात आले आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योग धोरणांतर्गत पाच वर्षांत 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि चार लाख लोकांना रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बेरोजगारीचा दर जून 2016 मध्ये 18 टक्के होता, तो एप्रिल 2022 मध्ये तो 2.9 टक्क्यांवर आला आहे. 4.22 लाख बेरोजगारांना नोकऱ्या देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUnemploymentबेरोजगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश