शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

योगी आदित्यनाथ हातात झाडू घेऊन करणार ताजमहालची सफाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 13:16 IST

भारताच्या इतिहास आणि संस्कृतीत स्थान असलेल्या ताजमहलवरुन सध्या चांगलाच वाद सुरु आहे. यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 26 ऑक्टोबर रोजी ताजमहालच्या गेटवर भाजपा कार्यकर्त्यांसोबत स्वच्छता अभियान राबवणार आहेत.

ठळक मुद्देमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 26 ऑक्टोबर रोजी ताजमहालच्या गेटवर भाजपा कार्यकर्त्यांसोबत स्वच्छता अभियान राबवणार आहेत500 भाजपा कार्यकर्ता योगी आदित्यनाथ यांच्यासोबत असणार आहेत

आग्रा - भारताच्या इतिहास आणि संस्कृतीत स्थान असलेल्या ताजमहलवरुन सध्या चांगलाच वाद सुरु आहे. यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 26 ऑक्टोबर रोजी ताजमहालच्या गेटवर भाजपा कार्यकर्त्यांसोबत स्वच्छता अभियान राबवणार आहेत. यावेळी 500 भाजपा कार्यकर्ता योगी आदित्यनाथ यांच्यासोबत असणार आहेत. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जवळपास 30 मिनिटे ताजमहालमध्ये घालवणार आहेत. यानंतर जवळच असणा-या शाहजहान पार्कात ते जातील. तिथे गेल्यानंतर शाहजहान आणि मुमताज यांच्या थडग्याजवळ अर्धा तास घालवण्यात येईल. जिल्हाधिकारी गौरव दयाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मुख्यमंत्री 26 ऑक्टोबर रोजी आग्राला जाणार आहेत. अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन करण्यासोबतच ताजमहाल आणि जवळपास असणा-या परिसराची पाहणी यावेळी केली जाईल. यासाठी आम्ही संपुर्ण व्यवस्था करत आहोत'.

ताजमहालवरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु असतानाच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या आग्रा दौ-याची घोषणा केली आहे. योगी आदित्यनाथ सरकारने या अर्थसंकल्पात ताजमहालला सांस्कृतिक वारसा स्थळांच्यायादीत समाविष्ट केले नव्हते. त्यांनी ताजमहालला भारतीय संस्कृतीचे प्रतीक मानण्यास नकार दिला होता. ताजमहल हा एका इमारतीशिवाय काहीही नाही, असे ते म्हणाले होते.

भाजपा आमदार संगीत सोम यांच्या विधानानंतर सुरु झालेल्या ताजमहालच्या वादावर अखेर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपली भूमिका मांडली होती. ताजमहाल कोणी बांधला ? कशासाठी बांधला ? हे महत्वाचे नाही. ताजमहाल भारतीय मजुरांच्या रक्त आणि घामाने उभा राहिला आहे. त्यामुळे ताजमहाल नि:संशय भारतीयच आहे असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते. ताजमहाल भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करत नाही. 'ताजमहाल बांधणा-यांनी उत्तर प्रदेश आणि हिंदुस्थानातील सर्व हिंदूंचा सर्वनाश करण्याचं काम केलं होतं. ताजमहाल भारतीय संस्कृतीवरील डाग आहे असे संगीत सोम म्हणाले होते. 

ताजमहालसाठी १५६ कोटीउत्तर प्रदेशच्या निर्णयावर जोरदार टीका सुरू होताच, पर्यटनमंत्री रिटा बहुगुणा यांनी ताजमहल व त्याच्याशी निगडित पर्यटन स्थळांच्या विकासासाठी राज्य सरकार प्रतिबद्ध असल्याचे सांगितले होते. ताजमहल आणि आग्य्राच्या विकासाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे प्राधान्य असेल, असे त्या म्हणाल्या, तसेच ताजमहल वा परिसराच्या विकासासाठी १५६ कोटी रुपयांची योजना केली आहे. ते काम तीन महिन्यांत सुरू होईल, असा खुलासाही त्यांनी केला होता.

टॅग्स :Taj Mahalताजमहालyogi adityanathयोगी आदित्यनाथ