शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

योगी आदित्यनाथ यांना ठार मारण्याची धमकी, उल्हासनगरमधून तरुणी पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 07:36 IST

Yogi Adityanath News: वरळी वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात बॉम्ब तसेच धमकीच्या फोनचे सत्र सुरूच असून, शनिवारी आणखी एका फोनने खळबळ उडाली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १० दिवसांत राजीनामा न दिल्यास त्यांना माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्याप्रमाणे ठार मारू, अशी धमकी देण्यात आली होती.

 मुंबई - वरळी वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात बॉम्ब तसेच धमकीच्या फोनचे सत्र सुरूच असून, शनिवारी आणखी एका फोनने खळबळ उडाली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १० दिवसांत राजीनामा न दिल्यास त्यांना माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्याप्रमाणे ठार मारू, अशी धमकी देण्यात आली होती.  राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) या प्रकरणाचा तपास करून उल्हासनगरमधून एका २४ वर्षीय तरुणीला ताब्यात घेतले. 

ही तरुणी माहिती तंत्रज्ञान विषयात बीएससी आहे. ती उल्हासनगर येथे कुटुंबीयांसह राहते. तिचे वडील लाकडाचा व्यवसाय करतात, असे अधिकाऱ्याने सांगितले. ही तरुणी सुशिक्षित असली तरी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याने तिची चौकशी सुरू असल्याचे वरळी पोलिसांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवर अभिनेता सलमान खान, आमदार झिशान सिद्दीकी यांना दोन व्यक्तींनी धमकी दिली होती. त्यापैकी एकाला झारखंड, तर दुसऱ्याला वांद्रे येथून अटक करण्यात आली. 

काय धमकी दिली?योगी आदित्यनाथ यांनी येत्या १० दिवसांत उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा न दिल्यास त्यांना माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्याप्रमाणे ठार मारू, अशी धमकी देण्यात आली. 

काय घडले?- वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील हेल्पलाइन क्रमांकावर शनिवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास अनोळखी मोबाइल क्रमांकावरून योगी यांना धमकी देण्यात आली. - नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. - त्यानुसार, प्रथम अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला आणि या धमकीचा फोन उल्हासनगरातून आल्याचे स्पष्ट झाले.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र