शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

Yogi Adityanath: 200 हून अधिक VVIP, सोनिया-अखिलेश यांनाही निमंत्रण; अशी आहे योगींच्या शपथविधीची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 19:27 IST

योगी आदित्यनाथांचा 21 मार्च रोजी लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर शपथविधी होऊ शकतो.

लखनौ: उत्तर प्रदेशात दणदणीत विजय मिळवल्यानंतर योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. होळीनंतर 21 मार्चला ते शपथ घेऊ शकतात. हा शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर हा सोहळा होणार आहे.

हजारो लोक सोहळ्यात येणारया शपथविधी सोहळ्याला 45 हजार लोक उपस्थित राहू शकतील असे सांगण्यात येत आहे. 200 हून अधिक व्हीव्हीआयपींची यादीही तयार करण्यात आली आहे. योगींच्या शपथविधीसाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी मुलायम सिंह यादव, अखिलेश यादव, मायावती यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना निमंत्रण पाठवले जाणार आहे. या सर्वांशिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा लाभ घेतलेल्या राज्यभरातील लाभार्थींचाही समावेश करण्यात येणार आहे.

शपविधीच्या जागेवरुन विरोधकांचा टोलामात्र या सोहळ्यापूर्वीच शपथविधीच्या 'जागे'वरुन राजकारण सुरू झाले आहे. समाजवाद्यांनी बांधलेल्या स्टेडियमशिवाय शपथविधीसाठी दुसरी जागा मिळाली नाही, असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला आहे. ज्या ठिकाणी योगींचा शपथविधी होत आहे, ते स्टेडियम अखिलेश यादव यांच्या कार्यकाळात बांधण्यात आले होते. बाहेरुन मुघल वास्तुकला असलेले आणि आतून खेळासाठी सर्व सुविधांनी सुसज्ज असलेले हे स्टेडियम आहे.

योगींनी स्टेडीयमचे नाव बदलले2018 मध्ये योगी सरकारने या स्टेडियमचे नाव माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने केले. येथे एक टी-20 सामनाही आयोजित करण्यात आला आहे. या स्टेडियमची क्षमता सुमारे 50 हजार असल्याचे सांगितले जाते. पण क्रिकेटचे हे स्टेडियम आता योगींच्या दुसऱ्या कार्यकाळाचे साक्षीदार होणार आहे. येथे मुख्यमंत्री योगी केवळ शपथ घेणार नाहीत, तर त्यांचे अन्य संभाव्य मंत्रीही या व्यासपीठावरुन शपथ घेतील.

दिल्लीत भाजपची बैठकत्या शपथविधीपूर्वी दिल्लीत नव्या सरकारबाबत मंथन सुरू आहे. दिल्ली भाजप कार्यालयात आज एक मोठी बैठक झाली. मुख्यमंत्री योगी यांच्यापासून जेपी नड्डा यांच्यापर्यंत अनेक दिग्गज उपस्थित राहिले आहेत. सर्वांनी नवीन सरकार आणि त्यांच्या संभाव्य मंत्र्यांबद्दल तपशीलवार चर्चा केली आहे.

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा