शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

2007 गोरखपूर दंगल : योगी आदित्यनाथांना उच्च न्यायालयाचा दिलासा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 17:12 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 2007 मध्ये उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे झालेल्या दंगलीदरम्यान प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणाची याचिका गुरूवारी उच्च न्यायालयाने फेटाळली. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 2007 मध्ये उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे झालेल्या दंगलीदरम्यान प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणाची याचिका गुरूवारी उच्च न्यायालयाने फेटाळली. या प्रकरणात गोरखपूरचे तत्कालीन खासदार आणि वर्तमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुख्य आरोपींपैकी एक होते. प्रक्षोभक भाषण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याचिकेमध्ये गोरखपूर दंगलीतील आदित्यनाथ यांच्या भूमिकेची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. परवेझ परवाज आणि असद हयात यांच्या याचिकेवर न्या. कृष्ण मुरारी आणि न्या. एसी शर्मा यांच्या खंडपीठाने सुनावणीनंतर हा निर्णय दिला. हत्या, हत्येचा प्रयत्न अशा विविध कलमांखाली खटला चालवावा अशी मागणीही याचिकाकर्त्यांनी केली होती. उत्तर प्रदेश पोलीस जाणून बुजून हे प्रकरण लटकवत ठेवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला होता. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. पोलिसांच्या तपासात कोणतेही त्रुटी समोर आलेली नाही. त्यामुळे ही मागणी फेटाळून लावत असल्याचे हायकोर्टाने सांगितले.    2007 मध्ये  योगी आदित्यनाथ यांना हिंसा भडकावणे आणि शांतता भंग करण्याच्या आरोपाखाली अटक देखील झाली होती. आरोपींमध्ये भाजप आमदार राधामोहन अग्रवाल, महापौर अंजू चौधरी यांचा देखील समावेश होता. प्रक्षोभक भाषण करुन अशांतता निर्माण करणे व अन्य कलमांखाली हा गुन्हा दाखल झाला होता.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशHigh Courtउच्च न्यायालय