Rinku Sharma Murder Case: रिंकू शर्मा 'रामभक्त', ऑलिम्पिक पदक विजेत्या योगेश्वर दत्तकडून न्यायाची मागणी

By स्वदेश घाणेकर | Published: February 12, 2021 03:34 PM2021-02-12T15:34:31+5:302021-02-13T10:09:40+5:30

राजधानी दिल्लीतील मंगोलपुरी भागात बजरंग दलाचे कार्यकर्ता रिंकू शर्माची ( Rinku Sharma Murder)  निर्घृण हत्या केल्याने तणाव निर्माण झाला आहे

Yogeshwar Dutt on Rinku Sharma Murder case says he is rambhakt; demands for justice   | Rinku Sharma Murder Case: रिंकू शर्मा 'रामभक्त', ऑलिम्पिक पदक विजेत्या योगेश्वर दत्तकडून न्यायाची मागणी

Rinku Sharma Murder Case: रिंकू शर्मा 'रामभक्त', ऑलिम्पिक पदक विजेत्या योगेश्वर दत्तकडून न्यायाची मागणी

googlenewsNext

राजधानी दिल्लीतील मंगोलपुरी भागात बजरंग दलाचे कार्यकर्ता रिंकू शर्माची ( Rinku Sharma Murder)  निर्घृण हत्या केल्याने तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी गुन्हे दाखल करून चार आरोपींना अटक केली आहे. मृत रिंकू सामाजिक कार्यात भाग घ्यायचा. दरम्यान, रिंकूने आवश्यकतेच्या वेळी हत्येतील मुख्य आरोपींपैकी एक इस्लाम या आरोपीच्या पत्नीला आपले रक्त दिल्याचे उघडकीस आले आहे. रिंकूला न्याय मिळावा अशी मागणी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त ( Yogeshwar Dutta) यानं केली आहे.  

२०१२च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या योगेश्वरनं ट्विट केलं की, मी रिंकू शर्माच्या कुटुंबीयांसोबत आहे. देश रामभक्त रिंकू शर्मासाठी न्याय मागत आहे.'' 

हल्लेखोर पूर्ण तयारीसह आले होते
एफआयआरनुसार दानिश हा त्याचे नातेवाईक इस्लाम, मेहताब आणि जाहिदसमवेत बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास घरासमोर रस्त्यावर आला. प्रत्येकाच्या हातात शस्त्रे आणि दंडुके होते. हे लोक रिंकूच्या घराबाहेर आले आणि त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरवात केली. आरोपी घरात घुसले. इस्लामने येऊन रिंकूचा गळा पकडला आणि त्याच्यावर हल्ला केला असा आरोप आहे. मेहताबने रिंकूवर चाकूने हल्ला केला.


'संपूर्ण रस्त्यावर रक्त पसरलेले'
मृत रिंकूची आई राधा शर्मा यांनी टाईम्स नाऊशी बोलताना सांगितले की, ती आदल्या दिवशी माझ्या मुलाला घराबाहेर फरफटत बाहेर काढले होते.  एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला बोलावले होते. त्याची तब्येत ठीक नव्हती, तो वाढदिवसाला जाऊन घरी पार्ट आला. तेव्हा त्याने त्याला घराबाहेर फरफटत नेलेआणि नंतर त्याला मारहाण करत चाकूने वार केले. त्या पुढेम्हणाले, "इतके रक्त सांडले होते की संपूर्ण रस्ता रक्ताने माखला होता."

चाकू रिंकूच्या पाठीत घुसवला होता. जेव्हा मनु आणि रिंकू ओरडला तेव्हा रिंकूचे मित्र आला. जेव्हा मित्राने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा चौघांनी त्याच्यावरही हल्ला केला. मनू आपला भाऊ रिंकूला संजय गांधी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. जेथे त्याचा भाऊ आणि मित्रालाही दाखल केले. डॉक्टरांनी रिंकूच्या शरीरातून चाकू बाहेर काढला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून चाकू पुरावा म्हणून ताब्यात घेतला.

Web Title: Yogeshwar Dutt on Rinku Sharma Murder case says he is rambhakt; demands for justice  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.