शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

'योगासनांमुळे इम्युनिटी पॉवर वाढते, कोरोनावर मात करण्यास योगा महत्वाचा'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 8:00 AM

२१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला, तेव्हापासून पहिल्यांदाच हा दिन आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सकाळीच योगासने करुन देशवासीयांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्ली - नवी दिल्ली : कोविड-१९ साथीमुळे रविवारी सार्वजनिक गर्दी टाळून डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा होत आहे. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला, तेव्हापासून पहिल्यांदाच हा दिन आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सकाळीच योगासने करुन देशवासीयांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, योग दिन हा विश्व बंधुत्वाचा संदेश देणारा दिवस असल्याचे मोदींनी म्हटले. त्यासोबतच, आपल्या सृदृढ आयुष्यासाठी योगा अत्यंत महत्वाचा असल्याचे सांगता कोरोनावर मात करण्यासाठी योगासने करण्याचेही मोदींनी सूचवले. 

‘योगा अ‍ॅट होम, योगा विथ फॅमिली’ (घरच्या घरी योग, परिवारासोबत योग), असे यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे घोषवाक्य आहे. २१ जून रोजी सकाळी ७ वा. लोक या आभासी समारंभात आपापल्या घरूनच सहभागी होऊ शकतील. विदेशातील भारतीय दूतावासांकडून लोकांना डिजिटल माध्यमातून योग दिन उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. त्यासाठी योग संस्थांची मदत घेतली जात आहे. यंदाच्या योगदिनी लेह येथे मोठा कार्यक्रम घेण्याची तयारी आयुष मंत्रालयाने केली होती. तथापि, साथीमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावानुसार २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने ११ डिसेंबर २०१४ रोजी घेतला होता. कोरोना आपल्या श्वसन यंत्रणेवर हल्ला करतो, पण प्राणायम केल्याने ही यंत्रणा मजबूत होते. प्राणायम करण्याचे अनेक प्रकार असून अनुलोम-विलोम, भ्रामरी इत्यादी प्रकार आहेत. प्राणायम केल्याने आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते, असेही मोदींनी म्हटले. योगोच्या सहाय्यानेच कोरोनावर मात करण्यास मदत मिळत आहे. योगामुळे मानिसक तणाव दूर होऊन शांतीसह संयम आणि सहनशक्ती मिळेल, असेही मोदींनी म्हटले.  

दरम्यान, ‘जगभरातली उच्चतम प्रतीची मानवी प्रज्ञा ‘शस्रे’ आणि ‘औषधे’ या दोन गोष्टींची अत्याधुनिक रूपे शोधून काढण्यात गुंतलेली असावी, हे अतिशय दुर्दैवी आहे. एक गोली बाहरसे मारती है, दुसरी गोली अंदरसे खोकला बनाती है.. हे कधीतरी थांबवावे आणि जगाला सुख-शांतीच्या, निरामय आरोग्याच्या सम्यक मार्गावर घेऊन जावे, असा विचार जगभरातली सुज्ञ माणसे आतातरी करणार की नाही?’ - असा सवाल योगगुरु बाबा रामदेव यांनी विचारला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने लोकमत वृत्तसमूहाच्या वतीने आयोजित ‘लोकमत : योगायुग’ या विशेष वेब-संवादात ते बोलत होते. रोझरी फाउण्डेशन पुणे हे या वेब-संवादाचे विशेष प्रायोजक होते.कोविड-१९ साथीमुळे रविवारी सार्वजनिक गर्दी टाळून डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा होणार आहे. 

टॅग्स :YogaयोगNarendra Modiनरेंद्र मोदीInternational Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिन