शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जगभरात योग उत्साहात!, लाखो लोकांनी केली योगासने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 04:24 IST

भारतासह जगभरात गुरुवारी योगविद्येचे महत्त्व विशद करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करून आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

नवी दिल्ली : भारतासह जगभरात गुरुवारी योगविद्येचे महत्त्व विशद करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करून आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेहराडूनमधील कार्यक्रमात ५० हजार लोकांसमवेत योगासने केली. ते म्हणाले की, संघर्ष व तणावाने ग्रस्त असलेल्या जगातील लोकांना एकत्र आणण्याचे सामर्थ्य योगविद्येमध्ये आहे. संयुक्त राष्ट्रांतही योगदिन साजरा झाला.योगासने केल्याने आरोग्य उत्तम राहाते हे सत्य पटल्याने जगभरातील अनेक देशांनी योगविद्येचा अंगीकार केला आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, विशाल जनचळवळीचे रूप धारण केलेल्या योगविद्येने जगातील करोडो लोकांचे आयुष्य समृद्ध केले आहे. काही तांत्रिक बाबींमुळे केंद्र सरकारच्या माहिती विभागाला (पीआयबी) यूट्युब चॅनलवरून पंतप्रधानांच्या डेहराडूनच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करता आले नाही. नेमका हा कार्यक्रम संपायला आणि यूट्यूबमधील तांत्रिक अडचण दूर व्हायला एकच गाठ पडली.देशाच्या प्रत्येक राज्यात योग दिन साजरा झाला. ज्या राज्यांत भाजपाची सत्ता नाही, तिथे भाजपाचे केंद्रीय मंत्री या कार्यक्रमासाठी गेले होते. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, हरयाणा, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड आदी राज्यांत तेथील मुख्यमंत्री सहभागी झाले होते.>नितीशकुमारांचे ‘ना’विविध राज्यांमध्ये योग दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमांत अनेक केंद्रीय मंत्री, राज्यपाल तसेच भाजपाचे नेते सहभागी झाले होते. मात्र योगासने ही वैयक्तिक बाब असून, त्याचे प्रदर्शन मान्य नाही, असे मत असलेल्या बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी योगदिनापासून दूर राहणे पसंत केले.मोदींबरोबर दुरावा निर्माण झालेले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मात्र विद्यार्थ्यांसमवेत योगदिनाच्या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला. केरळमध्ये अनेक नन्सनी योगासने केली.>राजस्थानच्या कोटा येथे एक लाखाहून अधिक लोकांनी योगासने करुन विश्वविक्रम केला. याची गिनिज बुकात नोंद घेण्यात आली आहे. बाबा रामदेव यांनी यावेळी योगासनांची प्रात्यक्षिके दाखविली. म्हैसूरमध्ये २०१७ साली योगशिबिरात ५५,५२४ जण सहभागी झाले होते. हा विक्रम गुरुवारी मोडला.>राष्ट्रपती सहभागी : विदेश दौºयावर गेलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुरिनाममध्ये राष्ट्राध्यक्ष देसिरे डेलानो यांच्यासमवेत योगासने केली.

टॅग्स :YogaयोगNarendra Modiनरेंद्र मोदी