शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

योगामुळे कमी होते नैराश्याची तीव्रता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 04:28 IST

योगा नैराश्याची तीव्रता कमी करण्यास मदत करतो आणि मेंदूतील विशिष्ट रसायनांची पातळी वाढविण्यास मदत करतो, तसेच झोपेचे चक्र, मनाची स्थिती, भूक आणि पचन क्रियेला नियंत्रित करतो

नवी दिल्ली : योगा नैराश्याची तीव्रता कमी करण्यास मदत करतो आणि मेंदूतील विशिष्ट रसायनांची पातळी वाढविण्यास मदत करतो, तसेच झोपेचे चक्र, मनाची स्थिती, भूक आणि पचन क्रियेला नियंत्रित करतो, असा निष्कर्ष आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सच्या (एम्स) ताज्या अभ्यासातून समोर आला आहे.प्रयोगशाळेतील प्रभारी प्रोफेसर रिमा दादा यांनी सांगितले की, या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, तणावाला कारणीभूत असणारे हार्मोन कमी करण्यास योगा मदत करतो. त्यामुळे तणाव कमी होतो. योगामुळे मानसिक तणाव कमी होतो. मार्चमध्ये ‘रिस्टोरेटिव्ह न्यूरॉलॉजी अँड न्यूरोसायन्स’जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. याबाबत १२ आठवडे अभ्यास केल्यानंतर हे निष्कर्ष समोर आले आहेत.नैराश्य ही प्रमुख आरोग्य समस्या आहे. यामुळे लक्षणीय विकृतीसह अन्य आजार उद्भवतात. बालपणात घडलेल्या प्रतिकूल घटनाही नैराश्याला कारणीभूत ठरतात. नैराश्यामुळे शरीराच्या सुरक्षणात्मक नियामक यंत्रणेत अडथळा निर्माण होतो व अनुवंशिक चक्र व पेशींच्या कार्याला हानी पोहचते. शरीरातील तणावाचा प्रतिकार करणाऱ्या यंत्रणेलाच नैराश्य बाधित करते. औषधोपचार व मानसोपचार हे नैराश्यावर गरजेचे आहेत. नैराश्यावर योगाच्या माध्यमातून उपचार केल्यास शारिरीक व मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते, असा निष्कर्षही समोर आला आहे.

टॅग्स :Yogaयोग