शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

योग दिनाची रंगीत तालीम; पाच हजार जवान होणार सहभागी

By admin | Updated: June 20, 2015 00:49 IST

मुंबईसह देशाचा अनेक भाग मुसळधार पावसाने ओलाचिंब झाला असताना २१ जूनच्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी राजधानी दिल्लीसह विविध राज्यांमध्ये जय्यत तयारी सुरू आहे.

नवी दिल्ली : मुंबईसह देशाचा अनेक भाग मुसळधार पावसाने ओलाचिंब झाला असताना २१ जूनच्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी राजधानी दिल्लीसह विविध राज्यांमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. लाखो लोक योगाभ्यासात व्यग्र आहेत. शुक्रवारी योग दिनाच्या रंगीत तालमीदरम्यान राजपथ हजारो लोकांनी फुलून गेले होते. राजपथावर रंगीत तालीमराजपथावरील रंगीत तालमीत विविध शाळांचे विद्यार्थी आणि एनसीसी कॅडेटसह १२,००० लोकांनी योगाभ्यास केला, अशी माहिती या समारंभाच्या समन्वयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या आयुष मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. रंगीत तालीम सकाळी ७ वाजता सुरू होऊन ७.३३ ला संपली. रविवारीसुद्धा याच वेळी योगासने केली जातील. रंगीत तालमीत सहभागी होणाऱ्यांना आसन बघता यावे म्हणून राजपथावर २३ भव्य एलईडी स्क्रीन लावण्यात आले आहेत. राजपथावरील योग दिन समारंभात ३५ हजारांवर लोक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.पाच हजार जवानांचा सहभागविशेष म्हणजे केंद्रीय दलांचे ५,००० जवान राजपथवर नागरिकांसोबत योगासने करणार आहेत. यामध्ये कें द्रीय औद्योगिक सुरक्षा दल, कें द्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ)आणि सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) प्रत्येकी १२०० जवान, तर भारत-तिबेट सीमा दल (आयटीबीपी) आणि सशस्त्र सीमा दलाचे (एसएसबी) प्रत्येकी ७०० जवानांचा समावेश राहील. परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज संयुक्त राष्ट्र मुख्यालयात आयोजित भव्य समारंभाचे नेतृत्व करणार असून गृहमंत्री राजनाथसिंग लखनौमधील योग शिबिरात सहभागी होतील. लखनौ, पाटणा आणि कोलकात्यात भव्य योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. शहर विकास मंत्री वेंकय्या नायडू चेन्नईला जाणार असून तेथे ३० हजारांवर लोक योगाभ्यासात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. पर्यटनमंत्री महेश शर्मा नोएडास्थित आपल्या मतदारसंघात हजेरी लावतील. कायदामंत्री डी.व्ही. सदानंद गौडा केरळची राजधानी तिरुवअनंतपूरममध्ये, तर आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा हैदराबादच्या संजीवय्या पार्कमधील योग शिबिरात भाग घेतील. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर मेरठमध्ये योगाभ्यास करतील आणि महिला व बालविकासमंत्री मेनका गांधी पिलीभीत या त्यांच्या मतदारसंघात योग शिबिराला उपस्थित असणार आहेत.कें द्रीय मंत्र्यांकडे वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड दिल्लीत, तर मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी या दिवशी शिमल्याला असणार आहेत.उत्तराखंड सरकारने पवित्रा बदललाआंतरराष्ट्रीय योग दिन समारंभात सहभागी होणार नाही असे सांगणाऱ्या उत्तराखंड सरकारने पवित्रा बदलला असून अधिकृतपणे या कार्यक्रमात सहभागाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हरीश रावत डेहराडूनमध्ये राज्यस्तरीय योग शिबिराचे उद्घाटन करतील. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव ओमप्रकाश यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे रावत यांनी दोन दिवसांपूर्वीच एका पत्रपरिषदेत आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणजे प्रचाराची कवायत असल्याची टीका करून राज्यात कुठल्याही सरकारी कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार नाही, असे जाहीर केले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)